जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत पोटनिवडणुकांची घोषणा

    दिनांक  13-Feb-2020 16:14:43

shrinagar _1  Hश्रीनगर
: जम्मू-काश्मीरमधील पंचायत पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी येत्या मार्चमध्ये रिक्त जागांवर पंचायत निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. या पंचायत निवडणुका आठ टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ५ मार्चला पहिला टप्पा, ७ मार्चला दुसरा टप्पा, ९ मार्चला तिसरा टप्पा, १२ मार्चला चौथा टप्पा, १४ मार्चला पाचवा टप्पा, १६ मार्चला सहावा टप्पा, २० मार्चच सातवा टप्पा आणि २० मार्चला आठवा टप्पा पार पडेल.


केंद्रशासित प्रदेश लडाखमधील निवडणुकांबद्दल निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार म्हणाले की, तिथून निवडणुका घेण्याची विनंती पाठविली गेली नाही, त्यामुळे लडाखचा अद्याप समावेश झालेला नाही. लडाखमध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाल्याने आणि हवामान चांगले नसल्याने यावेळी निवडणुका शक्य नाहीत नाही, असेही ते म्हणाले.