प्रवासी भारतीय केंद्र आता सुषमा स्वराज भवन

    दिनांक  13-Feb-2020 16:57:40


सुषमा स्वराज _1 &nbs

नवी दिल्ली
: १४ फेब्रुवारीला माजी परराष्ट्रमंत्री स्व.सुषमा स्वराज यांची जयंती आहे. यानिमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाने प्रवासी भारतीय केंद्राचे नाव सुषमा स्वराज भवन आणि परराष्ट्र सेवा संस्थेचे नाव सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या अमूल्य योगदानासाठी परराष्ट्र मंत्रालयाने १४ फेब्रुवारी त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही घोषणा केली आहे.


भारताचे परराष्ट्र मंत्री एस . जयशंकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ते म्हणतात," प्रवासी भारतीय केंद्राचे नाव सुषमा स्वराज भवन आणि परराष्ट्र सेवा संस्थेचे नामकरण सुषमा स्वराज संस्थान फॉरेन सर्व्हिस इन्स्टिट्यूट म्हणून ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही घोषणा करताना खूप आनंद झाला आहे कारण आम्हाला सतत प्रेरणा देणाऱ्या एका महान व्यक्तीला ही योग्य श्रद्धांजली आहे.आपल्या सर्वांना श्रीमती सुषमा स्वराज यांचे आजही स्मरणात आहेत."
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची जयंती १४ फेब्रुवारी रोजी आहे. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२रोजी हरियाणाच्या अंबाला येथे झाला. गतवर्षी ६ऑगस्ट रोजी त्यांचे ६७व्या वर्षी निधन झाले. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात स्वराज यांनी अखेरचा श्वास घेतला होता.परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी केलेले काम आणि परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट सेवांसाठी सन्मान म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज खूप लोकप्रिय होत्या.आपल्या कार्यकाळात त्यांनी परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना मदत केली. एका ट्विटला प्रतिसाद म्हणून लोकांच्या मदतीसाठी ती नेहमीच तयार असायची.