‘तान्हाजी’ नंतर अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज!

    दिनांक  13-Feb-2020 17:19:09
big bull_1  H x


अजयच्या चित्रपटात अभिषेक बच्चन दिसणार मुख्य भूमिकेत! 

मुंबई : ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’च्या अभूतपूर्व यशानंतर अजय देवगण आता एक कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. अजयने नव्या पोस्टरद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.


अजयने ट्विटरवर त्याच्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर ट्वीट केले असून, त्यासोबत प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. ‘बिग बुल’ असे या चित्रपटाचे नाव असून, २३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘बिग बुल’ची कथा नव्वदच्या दशकातल्या सर्वात मोठ्या शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित असून, या घोटाळ्यांचा मुख्य सूत्रधार हर्षद मेहतावर आधारित एक व्यक्तिरेखा अभिषेक बच्चन साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कूकी गुलाटी करणार असून, अभिषेक बच्चनसह इलियाना डिक्रूझ, निकिता दत्ता आणि सोहम शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बिग बुल’ हा अजय देवगणच्या होम प्रॉडक्शन चित्रपट आहे.
नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये सूट-बूट परिधान केलेला अभिषेक बच्चन दिसत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आर्थिक गुन्हेगारीवर आधारित खूप कमी चित्रपट आहेत. काही काळापूर्वी आलेला सैफ अली खानचा बाजारही शेअर बाजारात सुरू असलेल्या खेळावर आधारित होता. बिग बुलच्या माध्यमातून अभिषेक मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २०१९मध्ये आलेल्या मनमर्जीया या चित्रपटात अभिषेक झळकला होता. बिग बुल हा त्याचा यावर्षीचा पहिला चित्रपट असणार आहे. याशिवाय तो काल्पनिक पात्र बॉब बिस्बासवर आधारित सुजॉय घोषच्या ‘बॉब बिस्बास’ चित्रपटाच्या चित्रीकरणातही व्यस्त आहे. शाहरुख खान या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.