मुलीच्या शिक्षणासाठी परिस्थितीशी झगडणार इरफान खान!

    दिनांक  13-Feb-2020 16:16:53
irfan khan_1  H


बाप-लेकीचं नातं अधोरेखित करणाऱ्या 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित


मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक बुधवारी समोर आला. यानंतर गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या लूकसोबत त्याने एक भावूक संदेश देखील चाहत्यांना दिला होता.२०१७ मध्ये आलेल्या 'हिंदी मीडियम' चित्रपटानंतर अभिनेता इरफान खान पुन्हा एकदा या चित्रपटात भाषेचे महत्त्व पटवताना दिसतो आहे. होमी अदजानियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, २० मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


या चित्रपटात मध्यमवर्गीय कुटुंब, मुलीच्या शिक्षणाकरता धडपड करणारा, परदेशात मुलीला शिकवायचे ही इच्छा उराशी बाळगणारा हा बाप इरफान खान यांनी साकारला आहे. हा बाप लेकीसाठी नेमकं काय काय करतो? हे या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. कॉमेडीसोबतच इमोशनचा परफेक्ट तडका या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. इरफानच्या मुलीची भूमिका राधिका मदान करत आहे.या आधी इरफानने एका व्हिडीओद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. यांतून त्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले. या चित्रपटाच्या शुटिंगप्रमाणेच, प्रमोशन देखील इरफानला करायचे होते. पण तब्बेतीच्या कारणामुळे ते शक्य होत नसल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट 'हिंदी मीडियम' या चित्रपटाचा सीक्वल आहे.या चित्रपटात इरफान खानसह राधिका मदन,करिना कपूर, रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी, दीपक डोबरियाल, डिंपल कपाडिया, किकू शारदा अशी कलाकारंची तगडी फौज दिसणार आहे.