आप आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार ; एकाचा मृत्यू

12 Feb 2020 11:07:56

Aap Convoy fire_1 &n
 
 
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे मेहरौली येथील आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार झाला आहे. या घटनेत एका पक्ष कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. यादव मंदिरातून परत येत असताना त्यांच्या गाड्यांवर हल्ला झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हा हल्ला अचानक घडला असून यामागे नेमके काय कारण आहे हे अद्याप समजले नाही. "बंदुकीतून ४ राऊंड फायर झाले आहेत. ज्या गाडीत मी बसलेलो होतो त्या गाडीवर हल्ला झाला आहे. मला विश्वास आहे की पोलिसांनी योग्य तपास केल्यास हल्लेखोर पकडण्यास मदत होईल," असे आमदार नरेश यादव यांनी सांगितले.
 
 
अशोक मान (वय ४५)असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. गोळीबारामध्ये अजून एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे दोन्ही कार्यकर्ते यादव यांच्यासोबत होते. निवडून आल्यानंतर हे सर्वजण मंदिरात दर्शनासाठी गेले. तेथून परत येत असतानाच हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी किशनगढ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0