२५ देशांचे प्रतिनिधी काश्मीरच्या दौऱ्यावर

12 Feb 2020 12:55:23



kashmir visit _1 &nb


श्रीनगर : बुधवारी जर्मनी, कॅनडा, फ्रान्स आणि अफगाणिस्तानसह २५ देशांचे राजनयिक प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले. कलम ३७० रद्द केल्यांनतर सहा महिन्यांनंतर काश्मीरमधील सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हे शिष्टमंडळ दाखल झाले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राजदूताच्या नेतृत्वात १५ सदस्यांच्या शिष्टमंडळाने काश्मीरला भेट दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी युरोपियन युनियनसह आखाती देशांतील राजनयिक जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे शिष्टमंडळ पहिल्या दिवशी उत्तर काश्मीरच्या श्रीनगरमधील फळ उत्पादकांना भेटणार आहे. त्याचबरोबर सामाजिक गट, मीडिया आणि स्थानिक राजकारण्यांनाही भेटतील. भारतीय सैन्य खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेविषयी माहिती देईल आणि नवीन केंद्रशासित प्रदेशात पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविषयी व प्रभावित क्षेत्राविषयी माहिती दिली जाईल. दुसर्‍या दिवशी हे प्रतिनिधी जम्मूमध्ये राज्यपाल मुर्मू यांची भेट घेतील. येथे ते नागरी संस्थाना देखील भेटू देऊ शकतात.



kashmir visit_1 &nbs


जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडाच्या प्रतिनिधींचा यात समावेश
बुधवारी काश्मीरमध्ये पोहोचलेल्या या शिष्टमंडळांमध्ये कॅनडा, ऑस्ट्रिया, उझबेकिस्तान, युगांडा, स्लोव्हाक प्रजासत्ताक, नेदरलँड्स, नामीबिया, किर्गिझ प्रजासत्ताक, बल्गेरिया, जर्मनी, ताजिकिस्तान, फ्रान्स, मेक्सिको, डेन्मार्क, इटली, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, पोलंड आणि रवांडा याठिकाणच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिंडनर हे देखील यांच्यात शामिल आहेत.
Powered By Sangraha 9.0