राफेलच्या वेगवेगळ्या भागांचे भारतात उत्पादन सुरु

12 Feb 2020 14:37:56


IIT Nagpur _1  




मुंबई : भारतात लढाऊ विमान राफेलच्या उत्पादन सुरू झाले आहे. लढाऊ विमानांच्या दुहेरी इंजिनच्या संरक्षणासाठी दरवाजे बनविण्याचे काम नागपुरमधील अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स आणि फ्रेंच कंपनी डेसो एव्हिएशनच्या संयुक्त उद्यम प्रकल्पात तयार करण्यात येत आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानाशी संबंधित बहुतेक भाग येत्या काळात भारतात बनवले जातील. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात त्याचे भाग तयार करण्याचे उद्दीष्ट येत्या काही महिन्यांत राफेलचे उत्पादन वाढविणे हा आहे.
नागपूर आयटीआयचे विद्यार्थीही घेत आहेत प्रशिक्षण
नागपूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) विद्यार्थी राफेल आणि फाल्कन विमानातील विविध पार्ट जोडण्यास शिकत आहेत. फ्रेंच कंपनी डेसो एव्हिएशनने गेल्या वर्षी सरकारच्या आयटीआय नागपूर सरकारबरोबर करार केला. त्याअंतर्गत संस्थेत 'एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर' हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. भारत सरकारने फ्रान्सबरोबर ५८ हजार कोटींचा ३६ लढाऊ विमानांचा करार केला आहे. फ्रान्सने गेल्या वर्षी दसराच्या मुहूर्तावर भारताला पहिले राफेल विमान दिले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्समध्ये उपस्थित होते. सध्या हे विमान केवळ फ्रान्सकडे आहे.
Powered By Sangraha 9.0