ठाकरे सरकारच्या शपथविधीवर खर्च किती झाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |

cm ceremony_1  

४.६३ कोटी की २.७९ कोटी?

मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या शपथविधीवर किती खर्च करण्यात आला आहे? याची अचूक माहिती देण्यात महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे. याबाबतीत सादर करण्यात आलेल्या माहिती अधिकार अर्जाच्या वेगवेगळया माहितीमध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे शपथविधीच्या खरचवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांसाठी शिवाजी पार्क येथे शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. याबाबतीत एकूण किती खर्च झाला? या उत्सुकतापायी नेहमीप्रमाणे असंख्य अर्ज सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागाकडे दाखल झाले पण दुर्दैवाने कोणासही अचूक माहिती आणि आकडेवारी देण्यात आली नाही. अनिल गलगली यांस पाठविलेल्या माहितीत कक्ष अधिकारी रा.रो.गायकवाड यांनी एकूण खर्च २ कोटी ७९ लाख झाल्याचे कळविले आहे तर प्रथम अपील सुनावणीनंतर अजय बोस यांस एकूण खर्च ४ कोटी ६३ लाख झाल्याची माहिती कळविली आहे. या आकडेवारीत मोठी तफावत आहे. संपूर्ण माहिती नसतानाही अर्धवट माहिती देण्यात जन माहिती अधिकारी यांस काय स्वारस्य आहे? याबाबत मंत्रालयात चर्चा सुरु आहे.
 
अनिल गलगली यांच्या मते शपथ विधीवर झालेला खर्च हा जनतेच्या तिजोरीतुन झालेला असून या बाबत अचूक आणि खरी आकडेवारी महाराष्ट्र शासनाने माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५चे कलम ४ अंतर्गत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच माहिती मधील तफावत लक्षात घेता कोणी जाणूनबुजून माहीती तसेच खर्चाची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न तर नाही याची चौकशी करत कार्यवाही करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@