चीनला कोरोनाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पथकाची मदत

11 Feb 2020 13:47:31

china_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूंच्या संसर्गाने चीनसह जगभरात थैमान घातले असून यामुळे चीनमध्ये आतापर्यंत १००० जणांचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक चीनमध्ये दाखल होत आहे. करोना विषाणूंच्या फैलावाला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली पाठवलेले पथक काम करणार आहे.
 
 
 
चीनमधील कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले तीन हजार ६२ रुग्ण नव्याने सापडले असून, तेथील ३२ प्रांतांमधील एकूण रुग्णांची संख्या ४० हजार १७१ झाली आहे. याशिवाय, रविवारी ४००८ नवे संशयित सापडले आहेत, २९६ रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. आतापर्यंत ३ हजार २८१ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. चीनशिवाय, हाँगकाँगमध्ये ३६ रुग्ण सापडले असून, त्यातील एका जणाचा मृत्यू झाला आहे. रविवारी केवळ एक दिवसात आणखी ९६ जणांचा बळी गेला आहे.
Powered By Sangraha 9.0