सलग दुसऱ्यांदा काँग्रेस शून्यावर ; प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रांचा राजीनामा

11 Feb 2020 15:19:16

subhash chopra_1 &nb


नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आपच्या नावावर ६० जागा जागेवर वर्चस्व मिळवले. काँग्रेसला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली. 'काँग्रेस कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले मात्र यश आले नाही. पराभवातून नवीन शिकायला मिळते, असे चोप्रा म्हणाले. निवडणुकीच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
"काँग्रेस कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले मात्र यश मिळाले नाही. काँग्रेससाठी हा संघर्षाचा काळ आहे. आम्हाला दिल्लीचा जनादेश मिळालेला नाही याची संपूर्ण जाणीव आहे. निवडणुकीतला प्रत्येक पराभव शिकवतच असतो. या पराभवामुळे आमचे कार्यकर्ते नाराज नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा देतो. दिल्लीच्या विकासावर काँग्रेस नेते, कार्यकर्ते लक्ष ठेवणार आहे." असे मत सुभाष चोप्रा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळत आहे. आपचे ६२, भाजपचे ८ उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र काँग्रेसला एकही जागेवर आघाडी घेता आली नाही. दिल्लीमध्ये काँग्रेस सलग दुसऱ्यांदा शून्यावर राहिली.
Powered By Sangraha 9.0