भाजपने केला खासदारांना व्हीप जारी

11 Feb 2020 10:07:43

BJP Whip_1  H x
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपने खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. मोदी सरकार आज संसदेत एखादे महत्त्वाचे विधेयक मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. भाजपने तीन ओळींचा व्हिप जारी करत खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
 
भाजपने सादर केलेल्या या व्हिपनंतर सोशल मीडियावर कॉमन सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायदा ट्रेंड सुरू झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज अखेरचा दिन आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देणार आहेत. भाजपकडून दोन्ही सभागृहातील खासदारांना व्हिप बजावण्यात आला आहे. उपस्थित राहून सरकारचे समर्थन करण्याचे आदेश या व्हिपमधून देण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0