९३ बॉम्बस्फोटातील दहशतवादी मुसाला मुंबईतून अटक

    दिनांक  10-Feb-2020 15:16:43

Mumbai 93 blast_1 &n
गुजरात : १९९३मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने दहशतवादी मुनाफ हलारी मूसा याला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो पाकिस्तानच्या पासपोर्टवर प्रवास करत होते. १९९३मध्ये मुनाफ हलारीने झवेरी बाजारात स्फोट केला होता. तपास संस्था बर्याकच दिवसांपासून याचा शोध घेत होती. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २६० जणांचा मृत्यू, तर ७०० जण जखमी झाले होते.
 
 
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत अवघ्या दोन तासांतच १२ वेगवेगळ्या ठिकाणी १२ स्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये २६० लोक ठार झाले, तर ७०० लोक जखमी झाले होते. १९ नोव्हेंबर १९९३ रोजी हा खटला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी १९ एप्रिल १९९५ रोजी मुंबईच्या टाडा न्यायालयात सुरू झाली. पुढील दोन महिन्यांत आरोपींविरोधात आरोप निश्चित केले गेले. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला यापूर्वीच फाशी देण्यात आली आहे. मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम अद्याप पोलीस कोठडीबाहेर आहे.