पिडीतेच्या दरोडा गावात तणाव, जमावाने केली दगडफेक

    दिनांक  10-Feb-2020 14:02:11

wardha_1  H x W
वर्धा : हिंगणघाट पीडितेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर तिचे पार्थिव दारोडा तिच्या गावी पोहचवताना पोलिसांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी अॅम्ब्युलन्स गावामध्ये घेऊन जाताना पोलिसांना दगडफेकीचा सामना करावा लागला. यावेळी गावकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. मात्र, जमावाच्या मानाने पोलिसांची फौज कमी असल्यामुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली होती. येथील नागरिक प्रचंड संतापले असून ते न्यायाची मागणी करीत आहेत.
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. महाराष्ट्रामध्ये पीडितेच्या मृत्यूची बातमी कळताच दारोडा गावावर शोककळा पसरली होती. तसेच, तेथील नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी त्यांनी नागपूर- हैद्राबाद महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर अॅम्ब्युलन्स गावाजवळ येताच गावकरी मात्र आक्रमक झाला. दारोडातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेत अॅम्ब्युलन्स मध्येच थांबवून गावकऱ्यांनी दगडफेक सुरु केली. त्यानंतर गावकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना मात्र लाठीमार करावा लागला. अखेर अनेक युक्त्या आणि कठीण परिस्थीचा सामना करत पीडितेच्या पार्थिव कुटुंबाकडे सुपूर्त केले.