हिंगणघाटमध्ये जन'आक्रोश' ; आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा

10 Feb 2020 12:16:39

wardha_1  H x W
वर्धा : हिंगणघाट पीडितेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. यावेल्ली महाराष्ट्रभरातील वातावरण शोकाकुल झाले. परंतु, आरोपीला शिक्षा देऊन तिला न्याय मिळावा अशा मागण्या महाराष्ट्रभरातून येत आहे. तसेच, पीडित राहत असलेल्या दारोडा गावाच्या नागरिकांनी नागपूर- औरंगाबाद महामार्ग रोखून धरला आहे. तसेच, त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या गावात ३०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
महाराष्ट्रभर याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. 'त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला अद्दल घडवू.', 'त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे'., 'जसे त्याने तिला जाळले, तसे आमचीही त्याला जाळू.', अशा प्रकारच्या संतप्त भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अचानक या गावकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने पोलिसांची मात्र तारांबळ उडाली आहे. हजारो नागरिकांनी रस्ता अडवल्याने या रस्त्यावरची सर्व वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.
 
हिंगणघाट जळीतकांडानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दारोडा गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या तरुणीच्या मृत्यूची माहिती मिळताच गावात पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. गावात सुमारे तीनशे पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे. गावात पोलिसांकडून नजर ठेवण्यात येत असून गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0