ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला : चित्रा वाघ

    दिनांक  10-Feb-2020 12:42:36

chitra wagh_1  
 
 
मुंबई : हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. तसेच, राजकारणी आणि अनेक स्तरांमधून दिग्गजांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावर आपली उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
 
"गेले ७ दिवस ही निर्भया लढत होती. हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला. गेल्या ७ दिवसांमध्ये अशा ५ दुर्दैवी घटना झाल्या. ज्यामध्ये ३ पीडितांचा मृत्यू झाला. कोणत्या शतकात आहोत आपण, दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न कमी न होता वाढत आहेत. बाई म्हणून तिच्या कतृत्वाच्या कहाण्यांपेक्षा अत्याचाराच्या कहाण्या होत आहेत. कोण जबाबदार याला कोण घेणार जबाबदारी.?" अशा प्रकारचे मत त्यांनी समाजमाध्यमांसमोर व्यक्त केले आहे.
 
 
 
 
हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला. अखेर सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषद घेवून दिली. पीडितेचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच हिंगणघाटमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आजच न्याय द्यावा अशी मागणी करत कुटुंबीयांनी मागणी केली आहे.