केंद्रीय अर्थसंकल्पाला राष्ट्रपतींची मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |

budget_1  H x W




नवी दिल्ली
: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपतींच्या भेटीला गेले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे.



मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. आर्थिक स्तरावर अनेक आव्हानांना सामोरं जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, या अर्थसंकल्पातून काय सादर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशाचा आर्थिक विकासाचा दर म्हणजे जीडीपी २०२०- २१ या कालावधीत ६ ते ६.५ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१च्या छापील प्रती कडक सुरक्षतेत संसदेत आणल्या गेल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या छापील प्रती संसद भवनात जाण्यापूर्वी त्याची तपासणी करण्यात येत आहे. अर्थसंकल्प २०२० संसदेत सादर होण्यापूर्वी याचा परिणाम शेअर मार्केटवरही पाहायला मिळतो आहे. सेन्सेक्स ४० हजार ५७६ तर निफ्टी ११ हजार ९१० अंकांनी घसरला आहे.


@@AUTHORINFO_V1@@