टीबीमुक्त भारताचा निर्धार ; २० हजार नवी हॉस्पिटल उभारणार

01 Feb 2020 13:11:58

health budget 2020_1 



नवी दिल्ली
: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प २०२० सादर करत आहेत. या अर्थसंल्पामधून देशातील महत्वाच्या गोष्टींमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामधून भारतातल्या आरोग्य क्षेत्राला मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. वर्ष २०२५पर्यंत भारत टीबीमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली. तसेच 'टीबी हारेगा, भारत जितेगा' हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. मिशन इंद्रधनुष योजनेचा विस्तार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत २० हजार नवीन रुग्णालये स्थापित करण्याचे लक्ष्य आहे. तसेच, पीपीपी मॉडल अंतर्गत नवी रुग्णालये तयार केली जाणार आहेत.
 



आरोग्य क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा ; ७० हजार कोटींची घोषणा
 
देशाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी अर्थमंत्र्यांनी आणखी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मिशन इंद्रधनुष योजनेचा विस्तार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच, आयुष्यमान भारत योजनेंतर्गत २० हजार नवीन रुग्णालये स्थापन करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. तसेच, पीपीपी मॉडल अंतर्गत नवी रुग्णालये तयार केली जाणार आहेत. आरोग्य योजनांसाठी सुमारे ७० हजार कोटींची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0