‘तानसा पाइपलाइन पुल रस्ता’ प्रकरणी किरीट सोमय्यांनी दाखल केली याचिका

09 Dec 2020 17:11:21


किरीट_1  H x W:






रहिवाशांचे आक्षेप असताना, योग्य प्रक्रियेविना मंजूर केली निविदा

 



ठाणे: तानसा पाइपलाइन मुलुंड पुल रस्ता घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महानगरपालिका ठाकरे सरकार यांच्याविरोधात लोकयुक्तांकडे आज दि. ९ डिसेंबर रोजी याचिका दाखल केली. मुलुंड येथील तानसा पाइपलाइन पुल रस्ता प्रकरणी तब्बल १०० करोड रुपयांचा घोटाळा झाला असण्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 
 
 
 
 

बी एम सी कॉन्ट्रॅक्टर व बिल्डरचा फायदा व्हावा यासाठी हा घोटाळा करण्यात आला असून या प्रकरणी महापालिका आणि त्या अनुषंगाने ठाकरे सरकार दोषी असल्याचं मत किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले. यादरम्यान त्यांनी दाखल केलेल्या याचिकेचे फोटो व थेट लोक आयुक्त कार्यालयाच्या समोर उभे राहून काढलेळे फोटो त्यांनी माध्यमांवर प्रसिद्ध केले आहेत.

 
 

सदर रस्त्याचे काम हे स्थानिक रहिवाशांचे आक्षेप असताना आणि मुख्य म्हणजे योग्य प्रक्रियेविना निविदा मंजूर झाली असल्याचेही मत यावेळी किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले.

Powered By Sangraha 9.0