तळागाळातल्यालोकांचा हक्काचा माणूस

09 Dec 2020 19:58:40

bhandargit_1  H


हरिष भांदिर्गे... तळागाळातल्या लोकांचा हक्काचा माणूस आणि नगरसेवक म्हणून परिसरात ओळख. मूळ पिंड समाजसेवकाचा असल्यामुळे कोरोनाच्या काळात हरिष भांदिर्गे स्वयंस्फूर्तीने लोकांच्या मदतीला खर्‍या अर्थाने रस्त्यावर उतरले. कुणालाही कुठच्याही प्रकारची मदत करण्यास ते आणि त्यांचे कार्यकर्ते २४ तास तत्पर होते. तेव्हा, त्यांनी या महामारीच्या काळात केलेल्या मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...


हरिष कृष्णा भांदिर्गे
राजकीय पक्ष : भाजप
पद : उपाध्यक्ष, उत्तर मध्य भाजप
प्रभाग क्र. : १६४, चांदिवली
संपर्क क्र. : ९८९२८२१२९३


एप्रिलच्या सुरुवातीला कोरोनाचा कहर होता आणि कोरोनाच्या भीतीने अवघा देश ‘लॉकडाऊन’ झाला होता. कुणी कोरोनाने तर कुणी इतर आजारांनी ग्रस्त झाले, तर त्यांना सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका तर सोडा, दुसरे कोणतेही वाहनही उपलब्ध नव्हते. वाहन उपलब्ध झाले तरी दवाखाने उघडे नव्हते. रूग्ण कोरोनाग्रस्त असला तर आपणही कोरोनाग्रस्त होऊ, यामुळे परिसरातील खासगी दवाखाने बंद. महानगरपालिकेच्या दवाखान्यात तर कसलेच ताळतंत्र नव्हते. अशा परिस्थितीत प्रभाग क्र. १६४च्या रस्त्यावर उभे राहून लोकांना वाहन उपलब्ध करून देणे, कोरोनाविषयी जनजागृती करणे आणि लोकांना धीर देणे, असे काम करणे गरजेचे होते. ते काम केले नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी.

कोरोनाच्या भीतीने नेते, कार्यकर्ते आणि त्यांचा लवाजमा गावी किंवा घरात लपून बसलेला लोकांनी पाहिला. हातावरच्या बोटावर मोजता येतील असे सेवाभावी लोकच कोरोनाला न जुमानता लोकांच्या मदतीला धावत होते. त्यामध्ये हरिष भांदिर्गे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. एकतर त्यांच्या प्रभागात येणार्‍या वस्त्या या सेवाभावीच. त्यातही अल्पसंख्याक समुदायाची वस्तीही लक्षणीय. कोरोना संसर्गासंदर्भात काम करताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्याशिवाय या परिसरात काम होणेच शक्य नव्हते. पण, या काळात हरिष भांदिर्गे यांनी मानवतेचा आणि समरसतेचा उत्तुंग आदर्श समाजासमोर प्रस्थापित केला. प्रभागामधील सर्वच समाजातील लोकांना मदत कशी करता येईल, यासाठी त्यांनी नियोजन केले. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत किंवा कुणाचाही धीर खचणार नाही, अशा स्वरूपात भांदिर्गे यांनी लोकांशी कोरोनासंदर्भात संपर्क संवाद सुरू केला. मुख्यत: २४ तास लोकांच्या संपर्कात राहता येईल, असे नियोजन केले. त्यामुळे परिसरात कुठेही मदत लागली किंवा इतरही काही घटना घडल्या तर त्याबाबत हरिष यांना तत्काळ माहिती होई. मग त्यानुसार ते कार्यवाही करत. या काळात त्यांनी भाजपतील कार्यकर्ते, परिसरातील सेवाभावी संस्था, समाजमंडळे, गणेशोत्सव मंडळे, सेवाभावीवृत्तीचे लोक यांच्याशी समन्वय साधला. यातील बहुतेकांना आपत्कालीन सेवेचा अनुभव होता. त्यामुळे या सर्वांच्या समन्वय संपर्कातून त्यांनी परिसरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. वस्ती-वस्तीमध्ये, गल्लीबोळात सॅनिटायझेशन करणे गरजेचे होते. आधीच सांगितल्याप्रमाणे इथे सेवावस्तीचे प्रमाण लक्षणीय असल्याने सॅनिटायझेशनचे नियोजन आणि कार्यवाही महत्त्वाची होती. या वस्त्यांमध्ये जाऊन तेथील प्रमुखांशी संपर्क साधत वस्तीचे पूर्ण सॅनिटायझेशन करणे, तसेच तेथील लोकांची कोरोनाबाबत जागृती करणे गरजेचे होते. हे काम हरिष आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी केले.


bhandargit_1  H



माझे वडील कृष्णा हे पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते. ते प्रचंड समाजशील होते. पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळ संस्थेचे ते प्रमुख होते. माझी आईदेखील खूपच सेवाभावी वृत्तीची. त्यामुळे मातापित्यांचे संस्कार आणि रा. स्व. संघ आणि परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर आहे. त्यामुळे समाज आणि देशासाठी तन-मन-धन अर्पून सेवा करणे, हे माझ्या रक्तात आणि श्वासातच आहे.


या परिसरामध्ये हातावरती पोट असलेली लोकं जास्तच! कोरोनामुळे कामधंदे बंद पडले. लोकांना एकवेळचे अन्न मिळणे मुश्किल झाले. अशा वेळी त्यांना सन्मानाने अन्न वितरण करणे, हे महत्त्वाचे काम हरिष यांनी केले. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये दररोज हजारो लोकांसाठी अन्न शिजवले जात होते. तयार ताजे अन्न लोकांना वितरीत केले जाई. या कामासाठी कोरोना काळात मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ उभे करणे हे जिकिरीचे होते. पण, हरिष यांचा लोकसंपर्क दांडगा. त्यांना जीवाला जीव देणारे सख्खे मित्र आणि कार्यकर्ते भरपूर आहेत. हे सगळे कार्यकर्ते मित्र सेवाभावीच! त्यामुळे सर्वांनी हरिष यांच्या या अन्नवितरण कार्यक्रमात जमेल तसे योगदान दिले. गरीब-गरजू लोकांची यादी बनवणे, वस्त्यांची यादी बनवणे या वस्त्यांमध्ये किती लोकांना तयार अन्नाची गरज आहे, यासंदर्भात तपशील बनवणे, हे सगळे काम या सगळ्यांनी मिळून केले. त्यामुळे परिसरातील खर्‍या गरजूंपर्यंत अन्न पोहोचले.पुढे अन्नधान्य वाटपही हरिष यांनी केले. या काळात रेशनवर लोकांसाठी धान्य आले, पण यासंदर्भातही लोकांना खूप समस्या निर्माण झाल्या. काही रेशन दुकानात धान्यच उपलब्ध नव्हते, तर काही रेशन दुकानांमध्ये कागदपत्र आणि आधार जोडणी संदर्भात विचारणा होत होती. त्यामुळे लोकं अपेक्षेने आपला ‘हक्काचा माणूस’ म्हणून हरिष यांच्याकडे येऊ लागले. या लोकांच्या समस्या सुटाव्यात म्हणून मग हरिष यांनी नियोजन केले. मार्गदर्शन केले. त्यामुळे लोकांना त्यांचे हक्काचे रेशन उपलब्ध होऊ लागले.

याच काळात हरिष यांनी लोकांच्या आरोग्यासंदर्भातही अनेक उल्लेखनीय कामे केली. त्यातले प्रमुख काम म्हणजे कोरोनाग्रस्त रूग्ण असेल तर त्याला रुग्णालयात प्रवेश मिळवून देणे आणि त्यासंदर्भात पाठपुरावा करणे. याच काळात कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून हरिष यांनी प्रभागामध्ये २० हजार कुटुंबीयांना ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या गोळ्या वाटल्या. कोरोनाग्रस्तांसाठी काम करताना हरिषसोबत अनेक कार्यकर्ते असत. काम करता करता त्यांनाही कोरोना झाला. अशावेळी हरिष या कार्यकर्त्यांसोबत खंबीरपणे उभे राहिले. सर्व कार्यकर्ते बरे होऊन पुन्हा हरिष यांच्यासोबत सेवाकार्यही करू लागले. याच काळात हरिष यांना एक अनुभव आला. हॉस्पिटलमध्ये एका ओळखीच्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. ते कार्यकर्त्यांसोबत रात्री १च्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे स्टाफच कमी. त्यामुळे शव उचलण्यास कुणीच नव्हते. बरं, सोबतचे लोकही शव उचलण्यास घाबरतच होते. काही लोक तयार झाले, तर हॉस्पिटलमध्ये पीपीई किटही नव्हते. अशावेळी हरिष यांनी खा. पूनम महाजन यांच्या कार्यालयातून पीपीई किट आणले. स्वत: पीपीई किट घातला आणि शव उचलण्यास पुढे झाले. त्यांना पाहून उपस्थितांमधील लोकही पुढे आले. अशा या कोविड योद्ध्याच्या कार्याला सलाम!
Powered By Sangraha 9.0