‘AK vs AK’ मधील सैनिकी गणवेश आणि भाषा अयोग्य असल्याचे मत
मुंबई: नुकताच रिलीज झालेल्या ‘AK vs AK’ ह्या नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमधील सैनिकी गणवेश आणि पात्राच्या तोंडी असणारी भाषा भारतीय वायुदलाला शोभणारी नसून अयोग्य असल्याची टीका भारतीय वायू दलाने आपल्या अधिकृत ट्विटरवरून केली.
नेटफ्लिक्स हे माध्यम कायमच त्यांच्या वेब सिरीज आणि चित्रपटांच्या विषयावरून नेहमीच चर्चेत असतं आणि कधीकधी वादाच्या भोवऱ्यातही अडकतं. यावेळी अनिल कपूर आणि अनुराग कश्यप ह्यांच्या भूमिका असणाऱ्या ‘AK vs AK’ नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. यामध्ये अनिल कपूर एका वायुदल अधिकाऱ्याची भूमिका निभावत आहेत. आणि त्यासाठी त्यांनी परीधान केलेला गणवेश आणि संवादाची भाषा अयोग्य असल्याचे मत भारतीय वायुदलाने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले. आणि यामुळे ‘AK vs AK’ हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.
भारतीय सैनिकांच्या पराक्रमावर आणि देशभक्तीवर आधारित पटकथांवर याआधीही चित्रपट आलेले आहेत आणि ते प्रेक्षकांनी डोक्यावर सुद्धा घेतले आहेत. पण आता ‘AK vs AK’ चित्रपटातील अनिल कपूर यांनी परिधान केलेल्या वायुदल अधिकाऱ्याच्या गणवेशावरून व वापरलेल्या भाषेवरून उद्भवलेला वाद नेमके कोणते वळण घेतो, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.