खुशखबर! कोविडग्रस्तांच्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूसंखेत घट

08 Dec 2020 17:37:38


mask_1  H x W:







तब्बल ५ महिन्यानंतर सक्रीय रुग्णांचे प्रमाण घटले



नवी दिल्ली: तब्बल पाच महिन्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या घटल्याची भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सद्यस्थितीत देशात एकूण ३.८३ लाख कोविड सक्रीय रुग्ण असले तरी ती संख्या एकूण बाधितांच्या संख्येपेक्षा ४ % ने कमी असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

 
  


कोविड विरुद्धच्या लढाईत भारताने आता महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच गेल्या २४ तासांत नोंदल्या गेलेल्या नव्या कोविडग्रस्तांची संख्या २७,००० हून कमी म्हणजे २६,५६७ एवढी झाली आहे. हीच संख्या १० जुलैला २६,५०६ इतकी कमी होती. प्रतिदिन कोविड मुक्त होणाऱ्यांची संख्या आता सातत्याने वाढत आहे आणि भारतातील एकूण सक्रीय कोविडग्रस्तांच्या संख्येत नियमितपणे घट होत आहे.

 
 
 

कोविडविरुद्धच्या लढाईत आणखी एक आनंददायी बाब म्हणजे, भारतात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णाची संख्या एकूण बाधितांच्या ४% हूनही कमी झाली आहे. सक्रीय कोविड संसर्गग्रस्तांची संख्या कमी होऊन ३ लाख ८३ हजार झाली आहे. देशात सध्या सक्रीय असलेल्या कोविड रुग्णांची संख्या आता एकूण कोविड बाधितांच्या ३.९६% म्हणजे ३,८३,८६६ इतकी झाली आहे. या सगळ्या सकारात्मक बाबींमुळे इतके दिवस चिंतेचा विषय असणाऱ्या बाबतीतही म्हणजेच देशभरात कोविडमुळे रोज मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ४०० पेक्षा कमी व्यक्तींना कोविडचा संसर्ग झाला अशी नोंद झाली आहे.

Powered By Sangraha 9.0