तुम्ही सुद्धा शाळेत असताना 'हा' झेंडा १ रुपया देऊन विकत घेतला आहे का?

07 Dec 2020 16:41:09


zenda_1  H x W:






आजच्या दिवशी जाणून घ्या 'या' झेंड्याचे महत्व




मुंबई: दरवर्षी आज दि. ७ डिसेंबर रोजी देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा केली जाते. शाळेत असताना आपल्यापैकी प्रत्येकाने हा झेंडा विकत घेतला असेल. परंतु त्यामागचा खरा इतिहास आणि कारण आज जाणून घ्या.





भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ११ नोव्हेंबर हा दिवस
'स्मरण दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जात असे. त्या दिवसाला 'पॉपी डे' असे सुद्धा म्हणत. स्मरण दिनास निधी देणारास कागदी शोभेची फुलझाडे देण्यात येत असत. त्या काळातील माजी ब्रिटिश सैनिकांबरोबरच भारतीय सैनिकसुद्धा हा निधी वापरू शकत होते. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जुलै, इ.स. १९४८मध्ये भारताच्या संरक्षण मंत्रालयाला ही प्रथा अयोग्य वाटल्यामुळे त्यांनी अशा निधीचे संकलन एका विशिष्ट दिवशी करण्यात यावे व त्याचा विनिमय 'माजी सैनिक व सेवेतील सैनिकांसाठी' व्हावा असा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे १९४९ सालच्या २८ ऑगस्टला संरक्षण मंत्रालयाच्या समितीने ७ डिसेंबर या दिवशी ध्वजदिन अर्थात सशस्त्र सेना झेंडा दिवस साजरा केला जाईल असे ठरविले.




ज्या शाळा
, महाविद्यालयातील विद्यार्थी हा निधी ज्या सेवा भावी संस्थांच्या मदतीने निधी गोळा केला जातो त्या हा निधी देणाऱ्यांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे टोकन फ्लॅग देतात. ह्या झेंड्यावरील हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड व केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत. भारत देशाच्या सैनिकांनी केलेल्या शौर्याचे आणि निस्सीम देशभक्तीचे स्मरण करून देणारा हा सशस्त्र सेना झेंडा दिवस’ दिवस आजतागायत साजरा केला कजतो.

Powered By Sangraha 9.0