भडकाऊ भाषण प्रकरणात युवराज सिंहच्या वडिलांना नोटीस

07 Dec 2020 11:49:47

yOGIRAN SINGH_1 &nbs
 
 

माफी न मागितल्यास होणार कठोर कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील एक कार्यकर्ता आणि एका विद्यार्थी नेत्याने क्रिकेटर युवराज सिंहचे वडिल योगिराज सिंह यांच्यावर कथित भडकाऊ भाषण देण्याच्या आरोपांवरून कायदेशीर नोटीस बजावली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाचा व्हीडिओ व्हायरल झाला झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्त सत्यम सिंह यांनी संजीव कुमार यांच्यातर्फे ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यात योगराज यांनी एका समुदायाला अवमानित आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केलाच मात्र, शीख नेते जनरल सिंह भिंडरावाले यांचाही उल्लेख केला. या नोटीसमध्ये म्हटल्या प्रमाणे योगीराज यांचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात शेतकरी आंदोलनात भडकाऊ भाषण देण्याचा प्रकार उघडकीस येत आला आहे. त्यांच्या या भाषणामुळे दंगल घडून तणावही निर्माण होऊ शकला असता. एका समुहाची भावना भडकावली जाऊ शकत होती. जाणून बुजून असे करण्याचा प्रयत्न झाला असाही आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ विनाशर्थ माफी मागावी, अशी मागणी या नोटीशीद्वार करण्यात आली आहे.
 
 
 
तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असाही इशार यात देण्यात आला आहे. योगराज यांच्या या वक्तव्यामुळे ट्विटरवर #ArrestYograjSingh ट्रेंड सुरू होता. अनेकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती. दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या समर्थ आता संपूर्ण विरोधी पक्ष मैदानात उतरला आहे. काँग्रेस, टीआरएस, द्रमुक, आप महाराष्ट्रातून महाविकास आघाडी आदी पक्षांनी समर्थन दिले आहे. केंद्र सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या ११ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे.
 
 
 
कोणकोणत्या पक्षांचे शेतकरी आंदोलनाला समर्थन
तृणमूल काँग्रेस (TMC)

राष्ट्रीय जनता दल(RJD)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)

गुपकार अलायंस (PAGD)

आम आदमी पक्ष (AAP)

तेलंगाना राष्ट्रसमिति (TRS)

द्रमुक (DMK)

काँग्रेस

समाजवादी पक्ष (SP)

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)

ऑल इंडिया फार्वर्ड ब्लाक (AIFB)

केंद्रीय ट्रेड युनियन्सही यात सहभागी आहेत.






yOGIRAN SINGH 111_1 
Powered By Sangraha 9.0