रोगप्रतिबंधासाठी योगाभ्यासाचे महत्त्व भाग-१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2020
Total Views |

Yoga_1  H x W:
 
 
 
योगाभ्यास हा लहान मुले व वृद्ध व्यक्ती, ज्यांना रोगांचा प्रादुर्भाव लवकर होऊ शकतो, त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रतिकार करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे खूप आवश्यक असते. ताणतणावामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता स्पष्टपणे आढळून येते. तेव्हा, त्याविषयी आजच्या पहिल्या भागात काही आसनांची ओळख करुन घेऊया.
 
 
योगशास्त्र हे आत्यंतिक सूक्ष्म विज्ञानावर आधारित असून मन व शरीरामध्ये ऐक्य व संतुलन साधण्यावर त्याचा रोख असतो. निरामय जीवन जगण्याची ती एक कला व शास्त्र आहे. योगामुळे शरीर व मन, मानव आणि निसर्ग, व्यक्तिगत चेतना आणि वैश्विक चेतना यामध्ये चांगल्या प्रकारे ऐक्य साधले जाते. योगाभ्यासामुळे मानसिक व इंद्रिय विज्ञान शास्त्रविषयक आरोग्य, भावनात्मक संतुलन उत्तम प्रकारे राखले जाते आणि दैनंदिन जीवनातील ताण व त्यामुळे होणारे दुष्परिणाम दूर केले जाऊ शकतात. योगाभ्यासामुळे ताणतणावांमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते. योगासने, प्राणायाम, ध्यान, शुद्धिक्रिया व शिथिलीकरण क्रिया या योगिक क्रिया ताणतणावामुळे उत्पन्न होणाऱ्या शरीराच्या इंद्रिय विज्ञान शास्त्रसंबंधी प्रतिक्रियांमध्ये सुधारणा होण्यासाठी उपयुक्त ठरतात.
 
 
अनेक नियंत्रित संशोधनपर प्रयोगानुसार योगाभ्यास हा उच्च रक्तदाब, क्रॉनिक ओबस्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज (COPD), अस्थमा, अनिद्रा, मधुमेह अशा असांसर्गिक व्याधींचे, ज्या ‘कोविड-१९’ च्या रुग्णांमध्येदेखील आढळून येतात, नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
 
 
योगाभ्यास हा लहान मुले व वृद्ध व्यक्ती, ज्यांना रोगांचा प्रादुर्भाव लवकर होऊ शकतो, त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रतिकार करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे खूप आवश्यक असते. ताणतणावामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता स्पष्टपणे आढळून येते.
 
 
योगशास्त्रातील संशोधनानुसार ‘इनफ्लुएंझा’च्या साथीच्या काळामध्ये रुग्णांमधील आढळून येणाऱ्या तापाच्या लक्षणांवर योगोपचार आश्वासकरित्या परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. योगाभ्यासामुळे वृद्ध व्यक्तींमधील सलाईवरी बिटा डेफेशिअन्सी-२च्या पातळीमध्ये वाढ झाल्याने म्युकोसल प्रतिकारक्षमता वाढल्याचे आढळून आले आहे.
 
 
 
Yoga 1_1  H x W
 
 
 
सदर व्यक्तीसमूहाला रोगसंसर्ग अधिक प्रमाणावर होण्याची शक्यता असल्यामुळे एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांच्यासाठी योगाभ्यास खूप उपयुक्त ठरू शकतो.
 
 
ज्या वृद्ध व्यक्तींना अस्थमा व सीओपीडीचा त्रास आहे, अशांसाठी योगामधील क्रिया, योगासने व प्राणायाम हे श्वसनसंस्थेमधील प्रतिक्रिया कमी करण्यासाठी मदतरूप ठरतात.
 
 
योग व ध्यान यांचे प्रशिक्षण हे रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. तीव्र स्वरूपाचा Coryza व सर्दी यामध्ये ‘जलनेती क्रिया’ उपयुक्त ठरते. थंडीच्या मोसमात तापमान घटल्याने विषाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार झालेले असते. त्यामुळे या काळात विषाणूंचा फैलाव जास्त प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे थंडीच्या काळामध्ये अस्थमा व इतर श्वसनासंबंधी रोग बळावण्याचीदेखील शक्यता असते.
 
 
योगाभ्यासामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होण्यासाठी सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. विलगीकरण केलेल्या ‘कोविड-१९’ रुग्णांची मनो-सामाजिक देखभाल व पुनर्वसन यामध्ये योगाची खूप महत्त्वाची भूमिका असू शकते. विशेषतः रुग्णांमधील भीती व नैराश्य यावर मात करण्यासाठी योग उपचारांचा उपयोग होऊ शकतो.
 
 
आता आपण व्यायामाचे प्रकार बघूया.
 
 
सूक्ष्म व्यायाम
 
 
सूक्ष्म व्यायामामध्ये हाताच्या सर्व सांध्यांचा व्यायाम करावा. जसे की, हाताची मूठ पूर्णपणे बंद करून पुन्हा उघडावी. त्याचबरोबर दोन्ही हातांना वर करून सरळ रेषेमध्ये पुढे करावे. नंतर कोपऱ्यामध्ये वाकून हाताची बोटे खांद्यावर ठेवावी. नंतर पुन्हा हात सरळ करावे
 
 
दोन्ही हातांची बोटे खांद्यावर ठेवून गोलाकार आकारांमध्ये हातांना गोल फिरवावे, त्याचप्रमाणे पायाचाही व्यायाम करून घ्यावा.
 
 
पायाच्या तळव्यांना पुढे आणि मागे वाकून व्यायाम करावा करावा.
 
 
उभे राहून टाचा उचलाव्यात. (पाच वेळा)
 
 
ताठ उभे राहा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफा. तळहात खाली जातील अशा प्रकारे दोन्ही हात सरळ खाली ठेवा. श्वास घेत टाचा वर उचलत हात वर न्या. तळहात वर जाऊन हात ताणले जातील. श्वास सोडत पूर्वस्थितीत या.
 
 
हस्तप्रसारण (दहा वेळा)
 
 
दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत समोर घेऊन तळहात जोडून ठेवा.
 
 
श्वास आत घेत दोन्ही हात दोन बाजूला पसरत न्या. श्वास सोडत हात समोर आणा.
 
 
आता आपण आसनांचे प्रकार बघूया
 
 
भुजंगासन स्थिती
 
 
१. हात खाली आणून कोपरात वाकवा आणि तळहात शेवटच्या बरगड्यांपाशी जमिनीवर ठेवा. कोपरे शरीराच्या अगदी जवळ.
 
 
२. आधी डोके वर उचला. मग हाताने फारसा जोर न लावताच छाती सावकाश वर उचला. (नाग फणा काढतो त्याप्रमाणे.)
 
नाभीपर्यंतचा भाग वर उचला. नाभीखालचा सर्व भाग जमिनीला टेकलेला. पाठीच्या कण्याला सुंदर गोलाकार येऊ द्या. काही वेळ श्वसन करीत थांबा नि उलट क्रमाने, सावकाश, स्थितीत या.
 
 
लाभ : पाठीच्या कण्यावर दाब आल्याने तो सक्षम बनतो. अतिश्रमामुळे होणारी पाठदुखी थांबते. पोट आणि कमरेचा घेर कमी होतो. दमा, ब्रॉकायटिस आणि स्पॉण्डिलायटिस् यांवर अत्यंत उपयोगी.
 
 
पश्चिमतानासन स्थिती
 
 
१. हात बाजूने वर उचलून जमिनीला समांतर करा.
 
 
२. हात आणखी वर उचलून पूर्ण वर न्या. दंड कानांना चिकटवा. तळहात समोर. माकडहाडापासून शरीर वर ताणा. श्वास घ्या.
 
 
३. कमरेत पुढे वाका. (पाठीत वाकू नका.) शरीर नि हात जमिनीसमांतर होईपर्यंत, सावकाश श्वास सोडत, वाकत राहा.
 
 
४. तर्जन्यांचे आकडे करून पायांचे अंगठे पकडा. आता कमरेच्या मणक्यात ताण देऊन पाठ पुढे खेचा. हात वाकवून छाती मांड्यांना चिकटवा. डोके गुडघ्यात टेकवा. कोपरे जमिनीवर टेकवा. पोट ढिले सोडून श्वसन चालू ठेवा. पाय गुडघ्यात अजिबात वाकवू नका. (वा उचलू नका.) सरावाने या स्थितीत राहण्याचा वेळ वाढवा. श्वास घ्या आणि पाच ते आठ या उलट क्रमाने स्थितीत या.
 
 
लाभ : पाठीच्या कण्याला ताण मिळून मज्जारज्जू नि सर्व मज्जासंस्था कार्यक्षम बनते. भूक वाढते. मेद कमी होतो. पोटातील अवयवांना व्यायाम मिळून त्यांचे कार्य सुधारते. बद्धकोष्ठता कमी होते. कण्याच्या मुळाशी असलेली सुप्त (कुंडलिनी) शक्ती जागृत करण्यासाठीही या आसनाचा उपयोग होतो.
 
 
वक्रासन स्थिती
 
 
१. उजवा पाय गुडघ्यात वाकवून पाऊल डाव्या गुडघ्याजवळ येईल अशा तर्‍हेने जवळ घ्या.
 
 
२. कमरेत उजवीकडे वळा. पाठीचा कणा ताठ. (पोक काढू नका.) डावा हात पुढे काढून त्याच्या दंडाने उजवा गुडघा मागे रेटीत बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा हात मागे न्या. त्याचा आधार घेऊन पाठ ताठ ठेवा. श्वसन नियमितपणे.
 
 
शक्य तेवढा वेळ या स्थितीत थांबून मग उलट क्रमाने स्थितीत या. असेच डाव्या बाजूला करा.
 
 
लाभ : पाठीला पीळ बसल्यामुळे अर्धमत्स्येन्द्राचे सर्व लाभ या आसनानेही मिळतात.
 
 
(क्रमश:)
- फोरम शहा
(लेखिका योग प्रशिक्षक आहेत.)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@