...मग पवारांना कृषी विधेयकावर आक्षेप का?

07 Dec 2020 13:14:40


pawar_1  H x W:





भाजप नेते राम कदम त्यांचा ट्विटरद्वारे थेट सवाल

 


मुंबई : 'शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 'एपीएमसीच्या खासगीकरणासंदर्भात' ज्या बाबी सांगितल्या होत्या, त्याला अनुसरून त्यांचे आताचे बोलणे नाही' असे म्हणत भाजप नेते राम कदम यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिले होते त्याच्या प्रतीचा फोटोसुद्धा राम कदम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये जोडला आहे.
 
 
 
 

भारताचे कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी एपीएमसीच्या खासगीकरणासंदर्भात राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे मुद्दे सुचवले होते तशाच पद्धतीचे काही बदल करत केंद्र सरकारने कृषी विधेयक आणले आहे. मग आता शरद पवार यांचे बोलणे वेगळे का? शरद पवारांना या विधेयाकाविषयी नेमका आक्षेप तरी काय आहे? असा प्रश्न राम कदम यांनी विचारला आहे.
 
 

शरद पवार यांना कायमच शेतकऱ्यांचा नेता म्हणून संबोधले गेले आहे. मग सद्यपरिस्थितीत देशातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार काही सुधार करुन कृषी विधेयक आणत आहे, तर शरद पवारांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत विधेयकाच्या संदर्भात भूमिका घेणेच सामान्य जनतेला अपेक्षित आहे.



Powered By Sangraha 9.0