मधुकर बापट यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2020
Total Views |

RSS_1  H x W: 0 
 
 


नाशिक / मनमाड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व जनकल्याण समितीचे माजी अध्यक्ष, उद्योजक आणि शहरातील विविध संस्थांचा कार्यभार सांभाळणारे दानशूर व्यक्तिमत्व मधुकर बापट यांचे ५ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.बालवया पासून संघ स्वयंसेवक असलेले बापट यांच्या कार्याचा अवाका मोठा होता. नाशिक जनकल्याण रक्तपेढी व जनकल्याण समितीच्या कार्यात ते आवर्जून सहभाग घेत. जनकल्याण समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. शंकराचार्य न्यासाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयास अल्प दरात रक्त पुरवठा करण्याच्या उपक्रमात त्यांचा मोलाचा वाटा होता.
 

 
 
जनकल्याण रक्तपेढीची रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. शहरातील बालाजी मंदिराच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. चित्पावन ब्राह्मण संघात देखील ते कार्यरत होते. संघाची उद्योजक आघाडी त्यांच्याच प्रेरणेने स्थापन झाली होती. तसेच निमा, भारतीय शिक्षण मंडळ, नाशिक शिक्षण प्रशिक्षण मंडळ आदी विविध संस्थांमध्ये ते कार्यरत होते.
 
 
उद्योजक असलेले बापट हे दानशूर व्यक्तिमत्वाचे धनी होते. विविध समाज उपयोगी कार्याकरता ते स्वता देणगी देत असत व इतरांना देखील प्रोस्तहीत करत असत. काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात मेंदूस मार लागल्याने ते बेशुद्धावस्थेत होते व त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या जाण्याने नाशिककर एका सच्चा स्वयंसेवकास व प्रामाणिक कार्यकर्त्यास मुकला असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.



@@AUTHORINFO_V1@@