रिपब्लिकच्या कर्मचाऱ्याला पंचवीस दिवसांनी जामीन मंजूर

05 Dec 2020 13:27:26

republic _1  H



पनवेल (सोमेश कोलगे) :
रिपब्लिक टीव्ही ग्रुपचे कर्मचारी घनश्याम यांना अखेर पंचवीस दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. अर्णव गोस्वामींना अटक झाल्यानंतर घनश्याम यांना अटक झाली होती. पोलिसांच्या वतीने वेळ मागून घेण्यात येत होता. परंतु न्यायालयाने अखेर घनश्याम यांचा जामीन मंजूर केला आहे. घनश्याम सिंग हे रिपब्लिकच्या वितरणाचे काम पाहतात. कथित टीआरपी घोटाळ्याचे कारण देऊन घनश्याम यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेच्या वेळी तोंडाला काळे फडके बांधून कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे नेण्यात आले होते. घनश्याम यांचा दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. घनश्याम कारागृहात असल्यामुळे परिवाराची दिवाळी त्यांच्याशिवाय गेली. आज घनश्याम यांना अटकेनंतर पंचवीस दिवस कारागृहात काढल्यानंतर जामीन मंजूर झाला आहे.



Powered By Sangraha 9.0