कोरोना पॉझिटिव्ह असूनही विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

04 Dec 2020 13:35:55


corona_1  H x W






दक्षिण कोरियाम
धील धक्कादायक प्रकार



नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचं संकट पुन्हा एकदा घोंगावताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दि.३ डिसेंबर रोजी दक्षिण कोरियामध्ये ३५ कोरोना संक्रमित विद्यार्थ्यांसह लाखो महाविद्दयालयीन विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिल्याची घटना घडली आहे.


दक्षिण कोरियाच्या शिक्षण मंत्रालायाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात १३८० परीक्षा केंद्रावर जवळपास ४,९३,४३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यामध्ये ३५ कोरोना संक्रमित विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. याशिवाय, आयसोलेशन मध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांचासुद्धा यात समावेश होता. नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणारी ही वार्षिक परीक्षा कोरोनाच्या जागतिक संकटामुळे उशिरा झाली.



यादरम्यान
, गुरुवारी दक्षिण कोरिया देशात कोरोनाचे ५४० नवीन रुग्ण आढळले. हेच कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, द. कोरीयातले सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. भारतातसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. अशातच काल CBSE बोर्डाने ‘लेखी पद्धतीनेच परीक्षा घेऊ’ अशी घोषणा केली आहे. आता ह्या घटनेनंतरही CBSE बोर्ड त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

Powered By Sangraha 9.0