‘अटल भूजल योजने’अंतर्गत सिन्नर तालुक्याचा कायापालट

04 Dec 2020 21:05:03

atal bhujal yojana_1 
 
 



तालुक्यातील 87 , देवळ्यातील 42 गावांना योजनेचा फायदा

नाशिक : सिन्नर तालुक्यातील 87 ग्रामपंचायतींचा ‘अटल भूजल योजने’अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी होणार असून भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी या योजनेतून कामे केली जाणार असल्याने सिन्नर तालुक्याच्या भूजल पातळीवाढीस याचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेमुळे सिन्नर तालुक्याचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
 
 
भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत दिवसेंदिवस घसरण होत आहे. घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्याकरिता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी अटल भूजल योजना (राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प) केंद्रातर्फे राबवण्यात येत आहे. या योजनेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व देवळा या दोन ग्रामपंचायतींचा समावेश तालुक्यांमधील 116 करण्यात आला आहे. यात सिन्नर तालुक्यातील 87, तर देवळा तालुक्यातील 42 गावांचा समावेश असल्याने या दोन्ही तालुक्यांतील नऊ पाणलोट क्षेत्रात कृषी विभागामार्फत भूजल पातळीवाढीसाठी योजना राबवण्यात येणार आहे.
 
 
भूजलासंबंधित माहिती व अहवाल जनसामान्यांकरिता खुले करण्यासाठी 73.83 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलसंधारण, कृषी, लघु पाटबंधारे, ग्रामविकास आदी विभागांच्या सहभागातून योजनेची अंमलबजावणी होणार आहे. प्रत्येक वर्षातील कामांची आखणी करताना ‘अटल योजने’वरील ’विशेष’ कामांची नोंद केली जाणार आहे. यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आंतरविभागीय सुकाणू समिती नेमण्यात येणार आहे.
 
‘या’ गावांचा योजनेत समावेश आडवाडी, आगासखिंड, आटकवाडे, औंधेवाडी, बा. पिंप्री, भाटवाडी, भोकणी, बोरखिंड, चंद्रपूर, खापराळे, चोंढी, दहीवाडी, दापूर, दातली, केदापूर, शहापूर, दत्तनगर, देवपूर, धोंडबार, धोंडवीरनगर, दोडी खुर्द, डुबेरे, दुशिंगपूर, फर्दापूर, घोरवड, घोटेवाडी, गोंदे, गुळवंच, हरसुले, हिवरगाव, जामगाव, कारवाडी, के. पा. नगर, खडांगळी, खंबाळे, खोपडी बुद्रुक, कितांगळी, एकलहरे, कोमलवाडी, कोनांबे, कृष्णनगर, कुंदेवाडी, लोणारवाडी, मलढोण, माळेगाव, मापारवाडी, मनेगाव, मेंढी, मुसळगाव, गुरेवाडी, नाणेगाव, निमगाव देवपूर, पंचाळे, पांढुर्ली, पास्ते, पाथरे बु, पाथरे खुर्द, पाटोळे, पाटपिंप्री, पिंपळगाव, पुतळेवाडी, राहुरी, रामनगर, सांगवी, सरदवाडी, सावतामाळीनगर, सायाळे, शिवडे, शिवाजीनगर, श्रीरामपूर, सोमठाणे, सोनांबे, सोनारी, सुंदरपूर, उजनी, वडगाव पिंगळा, वडांगळी, विघनवाडी, विंचूर दळवी, वडगाव, वारेगाव या गावांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.



Powered By Sangraha 9.0