ब्रिटनमध्ये 'आॅक्सफर्ड'च्या कोरोना लसीच्या वापराला परवानगी; भारतात प्रतीक्षा

31 Dec 2020 12:49:31

covid vassin _1 &nbs


रुग्णसंख्या वाढल्याने ब्रिटनच्या निर्णय

लंडन - ब्रिटनमध्ये कोरोनोचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आपतकालीन परिस्थितीत AstraZeneca-Oxford च्या म्हणजेच 'आॅक्सफर्ड' लसीच्या वापराला ब्रिटनमध्ये मंजुरी मिळाली आहे. 'आॅक्सफर्ड' लसीच्या वापराला मंजुरी देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे. मात्र, भारतात अजूनही पुण्याच्या 'सीरम' संस्थेने तयार केलेली 'कोविशिल्ड' लस मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. 
 
 
 
 
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवा स्ट्रेन सापडला आहे. हा नवा स्ट्रेन मूळच्या कोरोनापेक्षा 70 टक्के अधिक प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बुधवारी ब्रिटनमध्ये एका दिवसात ५३ हजार कोरोना संक्रमित रुग्ण सापडले. आजवरची ही एका दिवसात सापडलेली सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनच्या 'मेडिसिन्स अॅन्ड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी'ने (MHRA)ने 'आॅक्सफर्ड' निर्मित लसीच्या वापराला तातडीने परवानगी दिली आहे. याचा अर्थ असा की, ही लस वापरण्यास सुरक्षित आणि प्रभावी आहे. ब्रिटनने कोरोना लसीच्या एकूण 10 कोटी डोसची ऑर्डर दिल्याचे समजते. त्यापैकी चार कोटी डोस हे मार्च २०१२१ पर्यंत उपलब्ध होतील.
 
 
 

 

AstraZeneca चे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियाट यांनी सांगितले की, कोरोनावर या लसीची उपयुक्तता अपेक्षेपेक्षाही जास्त आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कंपनीला विनिंग फॉर्म्युला सापडला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही ही लस उपयुक्त होईल अशीही आशा त्यांनी व्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे ही लस सामान्य घरगुती फ्रीजमध्येही ठेवता येणार असल्याने साठवणूकीचा खर्च वाचणार आहे. भारत मात्र अजूनही 'आॅक्सफर्ड' लसीच्या प्रतीक्षेत आहे. भारतात या लसीचे उत्पादन पुण्याची 'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया' करत आहे. ब्रिटनच्या एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, AstraZeneca-Oxford ही लस गेम चेंजर असेल. त्यांच्या मते या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर काही आठवड्यातच कोरोनापासून सुरक्षा प्राप्त केली जाऊ शकते.
 
 
Powered By Sangraha 9.0