आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या मदतीला रामदास आठवले यांची धाव

31 Dec 2020 15:15:44
rpi news_1  H x 

 
 
 
कल्याण : कल्याण पश्चिमेला राहत असलेले आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूरे यांचा त्यांच्या शेजाऱ्याशी असलेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचल्याने तो सोडविण्यासाठी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी काल सायंकाळी कल्याणमध्ये धाव घेतली.
 
 
बहादुरे यांच्या घरी आठवले येणार असल्याने त्याठिकाणी पोलिस ही पोहोचले. सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार ही उपस्थित होते. आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूरे यांचा त्यांच्या शेजाऱ्यासोबत भांडण झाले. या भांडणाचा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी बहादूरे व त्यांच्या शेजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या वादाची माहिती मिळताच बहादूरे यांच्या मदतीला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले धावले. त्यांनी काल सायंकाळी कल्याण गाठत बहादूरे यांची भेट घेतली. आठवले यांनी बहादूरे यांच्या घरी पोलिसांसमोर न्यायनिवाडा सुरू केला. पोलिसांनी आठवले यांनी घडल्या प्रकाराची पाश्र्वभूमी सांगितली. तसेच तपास सुरू असल्याचे सांगितले.
 
 
आठवले यांनी एका इमारतीत राहणाऱ्यानी एक मेकांच्या विरोधात शेरेबाजी करून भांडण करू नये. एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी उचित कारवाई करावी असे ही त्यांनी सूचित केले.
 
 
कोरोनामुळे 2020 हे वर्ष आर्थिकदृष्टया, सामाजिक आणि आरोग्य दृष्टया अत्यंत वाईट गेले. कोरोना काळात मला खूप वाईट अनुभव आले. आता अनलॉकमध्ये सगळे व्यापार उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे येणारे नवीन वर्ष आर्थिक दृष्टया चांगले राहील. पण कोरोना अद्याप गेला नसल्याने सर्वानी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रलय सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0