रात्री ११ नंतर फूड होम डिलिव्हरीला मुंबई महापालिकेची परवानगी

31 Dec 2020 14:16:21

food delivery _1 &nb


रात्री ११ नंतर घरात राहून पार्टी करण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबई - मुंबई महानगरपालिकेने नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या नाईट कर्फ्यूच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रेस्ट्राॅरन्टना रात्री ११ नंतर खाद्यपदार्थाची घरपोच डिलिव्हरी करता येणार आहे. तसेच रात्री ११ नंतर ग्रुपने बाहेर फिरण्यास मज्जाव असला तरी, घरात राहून पार्टी करण्यास परवानगी असल्याचे पालिकेने टि्व्ट केले आहे.
 
 
नववर्षाच्या स्वागताकरिता सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने नाईट कर्फ्यू लावला होता. त्यानुसार रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, या कर्फ्यू नियमांमध्ये महानगरपालिकेने आता शिथिलता आणली आहे. पालिकेने टि्व्ट करुन त्यासंबंधीची माहिती दिली आहे. या टि्व्टनुसार रात्री ११ वाजल्यानंतर गटाने बाहेर फिरण्यास बंदी असली तरी, घरात राहून ११ वाजल्यानंतर पार्टी करण्यात मुभा असल्याचे म्हटले आहे. तसेच यापूर्वी रात्री ११ वाजल्यानंतर रेस्ट्राॅरन्ट यांना खाद्यपदार्थाची घरपोच डिलिव्हरी करण्यास बंदी होती. आता ही बंदी हटविण्यात आली होती. आजपासून रेस्ट्राॅरन्ट चालक रात्री ११ वाजल्यानंतर खाद्यपदार्थाची घरपोच डिलिव्हरी करु शकतात.
 
 
Powered By Sangraha 9.0