स्मरण - २०२०

30 Dec 2020 22:25:45

page 8 _1  H x
२०२० हे वर्ष ‘कोरोना’बरोबरच विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गजांच्या ‘एक्झिट’मुळे मनाला चटका लावून गेले. हे मान्यवर आज आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृती आणि कार्याच्या माध्यमातून ते सदैव आपल्या स्मरणात राहतील. चित्रपटसृष्टी, राजकारण तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कित्येक ज्येष्ठ आणि तरुणांचीही यावर्षी प्राणज्योत मालवली. त्यापैकी फक्त काही ठळक व्यक्तिमत्त्वांची नोंद घेत आहोत. शिवाय सीमेवर हुतात्मा झालेले आपले शूरवीर जवान, कोरोना काळात अथक सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, परिचारिका, पोलीस कर्मचारी आणि सर्व कोविड योद्ध्यांचे स्मरण करुया. तेव्हा, नववर्षाचे स्वागत करण्यापूर्वी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे २०२० साली जगाला निरोप दिलेल्या सर्व मान्यवरांना भावपूर्ण आदरांजली....

page 8 Main Edition_2020-
Powered By Sangraha 9.0