कृषी मंत्री व पियुष गोयल यांनी केले शेतकऱ्यांसह भोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2020
Total Views |

piyush_1  H x W
 
 


वाचा काय झाले शेतकऱ्यांच्या आजच्या बैठकीत

 
 
 
नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात कृषी आंदोलन तापले असतानाच बुधवारी चर्चेच्या दिवशी शेतकरी आंदोलनकर्ते व केंद्रीय मंत्री यांच्यात सहकार्याची भावना दिसून येत होती. केंद्रीय मंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या आंदोलक नेत्यांनी मंत्र्यांसह दुपारचे जेवण केले. काहींनी गोयल यांच्यासह सेल्फीही काढला. कृषी आंदोलनकर्त्यांच्या चर्चेची ही सातवी फेरी आहे. गेले ३५ दिवस हे आंदोलन सुरू आहे. आजच्या चर्चेतूनच आंदोलनाचे भवितव्य ठरणार आहे.
 
 
 
युपी गेटवर सुरू आहे महापंचायत
 
यूपी गेटवर शेतकऱ्यांची तिसरी महापंचायत सुरू आहे. दुसरीकडे विज्ञान भवन येथे शेतकऱ्यांशी सरकार चर्चेसाठी पुढे येत आहे. महापंचायतीत शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहणार असे ठरले आहे. भाकीयु नेते नरेश टिकैत इथे शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
 
 
 
 
शेतकऱ्यांनी आणले स्वतःचे जेवण
 
 
शेतकरी नेत्यांनी बैठकी दरम्यान कार सेवेतर्फे टेम्पो जेवण घेऊन आला. गेल्या बैठकीप्रमाणे यावेळीही शेतकऱ्यांनी आपले जेवण स्वतःच आणले होते.
 
 
 
शेतकऱ्यांसोबत मंत्र्यांचे भोजन
 
 
दुपारी सुरू असलेल्या चर्चेत जेवणाची वेळ झाल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शेतकऱ्यांसोबत जेवण घेतले.
 
 
 
शेतकऱ्यांनी केली 'ही' मागणी
 
शेतकरी आंदोलनात आपले प्राण गमावणारे नेते, शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली जात आहे.
 
 
मागण्यांवर ठाम
 
 
शेतकरी आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या बैठकीत शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, असे कळते. तीनही कायदे रद्द करण्याच्या प्रक्रीयेबद्दल सांगा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 
 


 
@@AUTHORINFO_V1@@