सोसायटीत थर्टी फस्टचा प्लान करताय ? पोलीस तर येणारच!

30 Dec 2020 18:49:53

drone_1  H x W:



कलम १४९ अन्वये सर्व हौसिंग सोसायटयांना सूचना




बदलापूर: २०२१ हे नववर्ष आल्याने न्यू इयर सेलिब्रेशनचे वेध लागले आहेत. अनेकांनी हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसवर तर काहींनी सोसायटीतच न्यू इयर सेलिब्रेशनचे बेत आखले आहेत. मात्र सोसायटीच्या आवारात, टेरेसवर आणि सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे सेलिब्रेशन करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.
बदलापूर पश्चिम पोलिसांनी कलम १४९ अन्वये सर्व हौसिंग सोसायटयांना याबाबतच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:
१.नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर न पडता घरातल्या घरात साधेपणाने नववर्षाचे स्वागत करावे.

२. बागेत, रस्त्यावर किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये.

३. नववर्ष स्वागतासाठी इमारतीच्या गच्चीचे गेट बंद करून कोणासही टेरेसवर जाऊ देऊ नये व सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करू नये.

४. नववर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यावर देखील बंदी असणार आहे.

या सूचनांचे,नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस गावडे यांनी दिला आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार रात्री ११ ते सकाळी ६ च्या दरम्यान संचारबंदीचे आदेश लागू असणार आहेत. त्या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल, रेस्टोरंट,बार, ढाबे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीसुद्धा पोलिसांनी दिली आहे.



Powered By Sangraha 9.0