शूsss! वाचा आणि शांत बसा !

03 Dec 2020 16:37:12

Shivsena_1  H x
 
 



मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे कारवाई करायची आणि शिवसेना आमदार, नेते यांच्यामार्फत जाऊन संबंधित हातगाडी मालकाला मदत करायची. बेकायदा फेरिवाल्यांवर कारवाईच्या नावाखाली मराठी तरुणांच्या व्यावसायिक मानसिकतेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पालिका अधिकारी व प्रशासन करत आहेत का, असा सवाल विचारण्यात येत आहे. मात्र, पालिका अधिकारी नियमांवर बोट ठेवून मोकळे होत आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक कारवाई करून मराठी तरुणाच्या स्वप्नावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. अशीच एक कारवाई कांदिवलीतील ठाकूर व्हीलेज येथे योगीराज धनावडे यांच्या हातगाडीवर करण्यात आली आहे. त्यावर आकाश जाधव यांनी फेसबूक पोस्ट लिहीली आहे.
 
 
 
 
ते म्हणतात...
 
 
"हे असे कित्येक खेळ पाहते मराठी..
 
आपल्या घरात हाल सोसते मराठी..
 
मराठी मुलांनी व्यवसाय करायचा का नाही?
 
आज माझा मित्र योगीराज धनावडे याच्या ठाकूर व्हीलेज, कांदिवली पूर्व येथील पाव भाजी गाडीवर महानगरपालिकेकडून बुलडोझर चालवला. परवा दादर येथे देखील अश्याच प्रकारे मराठी माणसाला त्रस्त करण्यात आले.. आणि आज माझ्या माहिती मधील ही दुसरी घटना.. एक तर सत्ताधाऱ्यांच्या दलालांना हफ्ते द्या.. आणि नंतर गुंडांच्या दादागिरीच्या पावत्या फाडा.. आणि मग काही राहिलं तर आपलं पोट भरायचं.. इतक्या सगळ्यातून मराठी पाऊल पुढे पडत असताना मराठी तरुणांची इच्छाशक्ती ठेचण्याचं काम महानगर पालिकेकडून होत नाही का??
 
 
अनधिकृत परप्रांतीय फेरीवाले पचवले जातात... 
 
मग आपल्याचं महाराष्ट्रात, आपल्याचं मुंबईत, आपल्याचं मातीत व्यवसायाची धडपड करत असलेल्या मराठी तरुणावर हा अन्याय का?????
 
 
सदर ठिकाणी अनेक स्टॉल गाड्या आहेत.. त्यात ७०% परप्रांतीयांचे धंदे.. ३०% गाड्यांवर मराठी तरुण व्यवसायासाठी धडपडत आहेत..
 
 
आणि नेमक्या काही मोजक्या गाड्यांवर महागरपालिकेची धडक कारवाई होते..
 
 
याचा अर्थ नक्की काय म्हणायचा..??
 
 
बरं.. रस्ते आणि पादचारी मार्ग हे कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही पण, असे किती अनधिकृत आणि दांडगाई करून लावलेले धंदे आज सऱ्हास मुंबईच्या रस्त्यांवर दिसतील..
 
त्यांच्यावर कारवाई कधी झाली का??
 
 
मग स्वतःच्या कुटुंबासाठी रोजगार उभा करू पाहणाऱ्या मराठी माणसावरचं कारवाई का??
 
 
सदर महानगरपालिकेच्या कारवाईचा जाहीर निषेध !
 
✍🏻..
 
आकाश बळीराम जाधव
 
पोस्ट साभार - @दादर मुंबईकर
 
 
 


Powered By Sangraha 9.0