सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात उडी ; ३१ डिसेंबरला मोठी घोषणा

03 Dec 2020 14:29:02

Rajanikant_1  H
नवी दिल्ली : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आता राजकारणामध्ये सक्रीय होणार असून ३१ डिसेंबरला मोठी घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. रजनीकांत यांनी गुरुवार एक ट्विट करत ही घोषणा केली आहे. मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा ३१ डिसेंबर रोजी करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.
 
 
 
तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वारे जोरात वाहत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. रजनीकांत यांनीही सोमवारी आपल्या रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी रजनीकांत यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची घोषणा करत पक्षाच्या घोषणेची तारीखही जाहीर केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0