वालधुनी नदीत आता मेलेली जनावरे

28 Dec 2020 19:14:25
वालधुनी नदीत आता मेलेली जनावरे 
समितीच्या अध्यक्षा पुष्पा रत्नपारखीने वेधले प्रशासनाचे लक्ष
 
 
waldhuni nadi pusha ratna
 
 

कल्याण : वालधुनी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते. या नदीत कचरा आणि प्लास्टिक सर्रासपणो टाकले जाते. पण आता या नदीत मेलेली जनावरे टाकली जात असल्याचे दिसून आले आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि वालधूनी नदी स्वच्छता समितीच्या अध्यक्षा व भाजपा कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले आहे.
 
 
वालधुनी नदी ही अंबरनाथ औद्योगिक परिसरातून वाहत असल्याने ती प्रदूषित होते. ही नदी कल्याण खाडीला येऊन मिळते. वालधूनी नदीच्या पात्रलगत भंगारवाल्यांनी बस्तान बसविले आहे. त्यात भंगार, कचरा, प्लॉस्टिक टाकले जात आहे. वालधूनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा सुरू आहे. तिच्या विकासासाठी 611 कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे धूळ खात पडून आहे. या नदीत आता मेलेली जनावरे टाकली जात असल्याची बाब रविवारी निर्दशनास आली. या परिसरात मेलेल्या जनावरामुळे दरुगधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. कल्याण पश्चिमेतील योगीधाम, शिवअमृत या परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रस होत आहे. स्थानिक नागरिक करूणा मिश्र, सुभाष तनावडे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
 
 
Powered By Sangraha 9.0