ट्विटरवर मोदींचाच दबदबा

28 Dec 2020 14:15:43

narendra modi_1 &nbs




७६६५६६९ ट्विट एन्गेजमेन्ट्स; मोदी प्रथम क्रमांकावर



 
मुंबई: भारत देशात पुन्हा एकदा 'ट्विटर' या समाजमाध्यमावर पंतप्रधान मोदीच प्रसिद्ध असल्याचे दबदबा असल्या पुन्हा एकदा सिद्धझाले आहे. नोव्हेंबर महिन्यात मोदींच्या ट्वीट्सना ७६.६ लाख एन्गेजमेन्ट्स मिळाल्याची माहिती समोर आली आहे. 'अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म ट्वीट'च्या नोव्हेंबर महिन्यातल्या ओव्हरऑल इंडियन ट्विटर एन्गेजमेन्ट्स रॅंकिंग्जच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

ट्वीटीट राजकारण, पत्रकारिता, खेळ, बॉलिवूड, सेलिब्रेटिज आणि उद्योग अशा अनेक क्षेत्रामधील झालेल्या ट्वीट एन्गेजमेन्ट्सच्या आधारे रॅंकिंग ठरवले जात असते. आणि यामध्ये पहिल्या ४ क्रमांकामध्ये येण्याचा मान नरेंद्र मोदी, सोनू सूद, आनंद महिन्द्रा, विराट कोहली यांना प्राप्त झाला आहे.

सर्वसाधारणपणे भारतात ट्विटर एन्गेजमेन्ट्सच्या आधारे दिल्या जाणाऱ्या क्रमांकामध्ये राजकारण क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७६६५६६९ ट्विटर एन्गेजमेन्ट्स प्रथम क्रमांकावर आहेत. त्यानंतर २७.३ लाख ट्वीट एन्गेजमेन्ट्सने गृहमंत्री अमित शाह हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर २६.६ लाख ट्विटर एन्गेजमेन्टसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. चौथ्या क्रमांकावर २५.०८ लाख ट्वीट्स एन्गेजमेन्ट्ससह पत्रकार दिपक चौरासिया हे आहेत.



Powered By Sangraha 9.0