शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळण्यात अडवणूक झाल्यास शिक्षकसेना पाठीशी उभी राहील - ज.मो. अभ्यंकर

28 Dec 2020 19:33:22
शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळण्यात अडवणूक झाल्यास शिक्षकसेना पाठीशी उभी राहील - ज.मो. अभ्यंकर
 
 
 
 
 

shiksena_1  H x 

डोंबिवली : शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन मिळावे या विषयाला प्राधन्य असून तो आमच्या यादीवर प्रथम आहे. निवृत्तीवेतन मिळण्यात जर अडवणूक होत असेल तर दूर करण्यासाठी शिक्षकसेना निश्चित पुढे येईल, असे मत शिक्षकसेना प्रांताध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
 
 
न्यू सनराइज इंग्लिश हायस्कूल, भोपर रोड डोंबिवली येथे शिक्षक समस्या, निराकारण व शिक्षकसेवा विस्तार पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभ्यंकर बोलत होते. या कार्यक्रमात पालघर, ठाणे , रायगड, कोकण विभागातील शिक्षक उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. जगदीश भगत, डॉ. किशोरी भगत, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, कोकणप्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, अजित चव्हाण, अरविंद नाईक, मंगेश पाटील, शिवाजी शेंडगे, चिंतामण वेखंडे, मुकेश शिरसाठ, नामदेव सोनावणो, मुरलीधर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
अभ्यंकर म्हणाले, शिक्षक किंवा शिक्षकेत्तर कर्मचारी हा सेवानिवृत्त होणार असेल त्याच्या दोन वर्षे आधी पासून त्याचे पेन्शन पेपर तयार करावेत. शिक्षक संख्या मंजुरीचे धोरण बदलले पाहिजे. शाळा म्हणजे व्यापारी संकुल नाही. मुलाची प्रगती करणे हेच शाळेचे काम आहे. विद्याथ्र्याना सगळ्य़ा विषयांना शिक्षक मिळाले पाहिजे. शाळेमध्ये सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. माध्यामिक शिक्षण हे राज्यशासनाची जबाबदारी आहे . प्रत्येक शाळेला शिक्षक मिळाला पाहिजे त्यासाठी शिक्षकसेना काम करीत आहे. पतीपत्नी एकत्रीकरण, अतिरिक्त समायोजन असे प्रश्न गंभीर आहेत. अनुदान आणि पेन्शन हे प्रश्न नक्कीच सुटतील. जुन्या जी. आर. मध्ये दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
प्रा. जगदीश भगत, डॉ. किशोरी भगत यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईत अधिवेशन घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0