देशात आज २१,४३० रुग्ण ‘कोरोना’मुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |
covid _1  H x W
 
 

नवी दिल्ली : भारताने जागतिक महामारीच्या साथीविरुध्दच्या लढ्यात महत्वपूर्ण शिखर गाठले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दररोज आढळणार्‍या नवीन रुग्णांची संख्या आता १९,००० पेक्षा कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत रुग्णांची राष्ट्रीय संख्या एकूण १८,७३२ इतकी आढळून आली आहे. दिनांक १जुलै २०२० रोजी नवीन रुग्णांची संख्या १८,६५३ इतकी आढळली होती.
 
 
सध्या भारतातील एकूण रुग्णसंख्या २.७८ लाख (२ लाख ७८ हजार ६९०) झालेली आढळून आली. गेल्या १७० दिवसांमधील ही सर्वात कमी संख्या आहे. १० जुलै २०२० रोजी नवीन रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजार ६८२ इतकी आढळली होती. देशात सक्रीय रुग्णांची संख्या कमी होण्याचा कल कायम राहिला असल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत २१,४३० रुग्णांना उपचारांनंतर बरे होऊन घरी पाठविण्यात आले. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या एकूण २ हजार ९७७ ने कमी झाली आहे.
 
 
७२.३७% रुग्ण १० राज्ये/केंद्रशासित प्रदेशात केंद्रीत झालेले आढळून आले आहेत. केरळमध्ये ३,७८२ रुग्णांसह एकाच दिवशी बरे होणार्‍या सर्वाधिक रूग्णांच्या संख्येची नोंद झाली. ७६.५२% नवीन रुग्ण १० राज्ये/केंद्रशासित प्रदेशात केंद्रित झाल्याचे आढळून आले आहे. केरळमध्ये सर्वाधिक ३,५२७ रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्रात २,८५४ नवीन रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत २७९ रुग्णांचा मृत्यु झाला. १० राज्ये/केंद्रशासित प्रदेशात नव्याने रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण ७५.२७%आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक(६०)रुग्ण मृत्यूमुखी पडले.



@@AUTHORINFO_V1@@