खुर्ची वाचवण्यासाठी इमरानचा सरकारतर्फे दहशतवादाचा सहारा

27 Dec 2020 19:38:04
loc_1  H x W: 0
 
 

२५० दहशतवादी एलओसीवर घुसखोरीच्या प्रयत्नात

श्रीनगर : पाकिस्तान सरकार यावेळी बऱ्याच मुद्द्यांनी घेरली गेली आहे. गटांगळ्या खाणारी अर्थव्यवस्था, कोरोनाचा हाहाःकार आणि विरोधी पक्षांची घेराबंदी यात आता दहशतवादाचा आसरा घेण्याचा विचार पाक करत आहे. भारतीय सैन्याच्या टॉप कमांडरने याबद्दल एक वक्तव्य केले आहे. देशांतर्गत मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी एलओसीवर अशांतता पसरवण्याचा विचार पाकिस्तान करत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
काश्मीरमध्ये तैनात चिनार कॉर्प्सचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी हा दावा केला आहे. चिनार कॉर्प्स सीमासुरक्षेसह दहशतवाद्यांच्या विरोधात सर्च ऑपरेशनही चालवते. बीएस राजू म्हणाले, “एक अहवाल मिळाला आहे. पाक व्याप्त काश्मीरच्या लॉन्च पॅडवर २०० ते २५० दहशतवादी उपस्थित आहेत. सर्वजण घुसखोरीच्या तयारीत आहेत. कमी उंचीच्या भागावरून सर्वजण घुसखोरी केली जाणार आहे. उत्तरेकडे होणाऱ्या बर्फवृष्टीचा आणि कडाक्याच्या थंडीचा फायदा घेऊन तणाव निर्माण केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
 
 
हवामानाचा फायदा उठवणार
 
राजू म्हणाले, “दहशतवादी घुसखोरीसाठी खराब हवामानाचा फायदा घेऊ शकतात. मात्र, सुरक्षादल याचा विरोध करण्यासाठी सज्ज आहेत. एलओसीतून काश्मीरमध्ये होणारी संभाव्य घुसखोरी व पीर पंजाल भागात नजर ठेवून आहोत. एलओसीवर आम्ही सुसज्ज आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी सर्व्हीलंस डिव्हाईसची मदत घेतली जाणार आहे.
 
 
इमरान सरकारच्या अडचणीत वाढ
 
पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय अस्थिरतेचे वादळ घोंगावत आहेत. देशच्या ११ राजकीय पक्षांशी युती असलेले पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंटतर्फे इमरान यांना पायउतार करण्यासाठी मोहिम उघडली आहे. पाकिस्तानी सैन्यालाही पिंजऱ्यात आहे. इमरान खानच्या मते, “ विरोधक ही भारताच्या बाजूने आहेत. ते सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यापूर्वी असे कधीही झालेले नाही.
Powered By Sangraha 9.0