रत्नागिरीत आढळले दुर्मीळ 'इजिप्शिअन गिधाड'

25 Dec 2020 15:16:28

vulture_1  H x  
 

पक्षीनिरीक्षकांनी केली नोंद


मुंबई (अक्षय मांडवकर) - रत्नागिरीमधील चंपक मैदान परिसरात दुर्मीळ 'इजिप्शिअन गिधाड' (पांढरे गिधाड) आढळून आले आहे. तालुक्यातील हौशी पक्षीनिरीक्षकांना १९ डिसेंबर रोजी पक्षीनिरीक्षणादरम्यान हे गिधाड आढळून आले. कोकण किनारपट्टीदरम्यान गिधाडांचा अधिवास असून प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने गिधाडे आढळतात.

 


 
महाराष्ट्रातून गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली, तरी पांढऱ्या पुठ्ठ्याची’, ‘लांब चोचीचीआणि पांढरी गिधाडे१९९० आणि त्यापूर्वी मोठय़ा संख्येने आढळत होती. देशभरात गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर अपुऱ्या खाद्यपुरवठय़ामुळे राज्यात आढळणारी गिधाडे सुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश नष्टप्राय श्रेणीतील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. कोकणात गिधाडांचा अधिवास आहे. खास करुन रायगड जिल्ह्यातील म्ह्साळा, श्रीवर्धन तालुक्यामध्ये गिधाडे आढळतात. या परिसरातून हिमालयीन ग्रिफन गिधाडांचाही नोंद आहे.
 
 

काही महिन्यांपूर्वी रायगड - रत्नागिरीला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका इथल्या गिधाडांच्या अधिवासाला बसला होता. गिधाडांची घरटी असणारी झाडे उन्मळून पडली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्ववत होऊ लागल्यावर गिधाडे परतू लागली आहेत. गिधाडांमधील अशाच एका दुर्मीळ प्रजातीची नोंद रत्नागिरीतून करण्यात आली आहे. १९ डिसेंबर रोजी रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या चंपक मैदानात हौशी पक्षीनिरीक्षकांना 'इजिप्शिअन गिधाड' दिसले. पक्षीनिरीक्षक आशिष शिवलकर, डाॅ. प्रणव परांजपे आणि अॅड प्रसाद गोखले यांनी या गिधाडाचे छायाचित्र टिपले. यापूर्वी २०१२ मध्ये रत्नागिरीतून डॉ.वैद्य, भाई रिसबूड, डॉ.सचिन पानवलकर, डॉ. प्रणव परांजपे यांनी या प्रजातीची नोंद केली होती. केवळ नोंदच नव्हे, तर चंपक मैदान परिसरातील नैसर्गिक पाणी साठा आटत आल्याने टँकरने पाणी पुरवठा करून या पक्ष्यांसाठी तेथील पाणीसाठा जीवित ठेवण्याचा प्रयत्न या पक्षीनिरीक्षकांनी केलवा होता. तसेच शिकाऱ्यांपासून वाचविण्यासाठी प्रयत्न देखील अंमलात आणले होते. येथील प्लास्टिक कचरा देखील हटविण्यात आला होता.

 


Powered By Sangraha 9.0