पाकड्या शोएबचे गजवा ए हिंदचे स्वप्न

    दिनांक  22-Dec-2020 13:38:37
|
shoeb_1  H x W:
 
 

"भारत-पाक सीमा नष्ट होतील, रक्ताच्या नद्या वाहतील!"; ओकली गरळ
इस्लामाबाद : माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरला हा मैदानात असो वा मैदानाबाहेर पाकिस्तानची वादग्रस्त संस्कृतीचा वारसा चालवणाऱ्या शोएब अख्तरने आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. एका व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये त्याने दावा केला होता की, गजवा-ए-हिंद प्रत्येक पाकिस्तान्याचे स्वप्न आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ते पूर्ण व्हायला हवे.
 
 
 
व्हीडिओमध्ये अख्तर एका पत्रकाराशी चर्चा करत आहे. त्यात तो म्हणतो, “गजवा-ए-हिन्द हा उल्लेख पाक पुस्तकात केलेला आहे. त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहे. आम्ही आधी काश्मीरवर कब्जा मिळवू त्यानंतर हिंदुस्तानात जिथे तिथे हल्ला करू, अशा प्रकारे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व सीमा मिटवून टाकू आणि गजवा ए हिंद आमचाच असेल.
 
 
'गजवा-ए-हिंद' म्हणजे काय ?
 
 
गजवा-ए-हिंदचे दिवास्वप्न कट्टरपंथी आजच नव्हे तर मुगलांच्या काळातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोबिन्द सिंह महाराज आदींसारख्या शूरवीर योद्ध्यांनी ही स्वप्ने धुळीस मिळवली होती. याच मनसुब्याला समोर ठेवून पाकिस्तान १९४७ पासून भारताशी युद्ध करत आला आहे. त्यावेळीपासून काश्मीरवर कब्जा करण्याचे मनसुबे रचले जात आहेत.
 
 
शोएब अख्तरने यापूर्वीही अशीच गरळ ओकली आहे. वेळोवेळी स्वतःला कट्टरपंथी म्हणून सिद्ध करण्याची संधी तो सोडत नाही. पण जेव्हा पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाचा मुद्दा येतो ते तेव्हा पंथनिरपेक्ष करण्यासाठीही पुढे असतो. त्यात पाकिस्तानी क्रिकेट टीममध्ये अल्पसंख्यांक क्रिकेटपटूंवर होणारा अन्याय त्याने मांडला होता. मात्र, हा केवळ दिखावा असतो हे वारंवार सिद्ध झाले आहे.
 
 
सेहवागने फटकारले
 
 
माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी मात्र, शोएबचा हा दुटप्पी चेहरा उघड केला होता. भारताबद्दल गोड हा गोड बोलणारच कारण त्याला इथला व्यावसाय सांभाळायचा आहे. तेव्हा कुठे त्याचे पोट भरणार आहे., अशी टीका सेहवान यांनी शोएबवर केली होती.
 
 
भारतात पैसे कमावून भारताविरोधातच गरळ
 
 
वसीम अकरम यांनी भारताबद्दल अशीच भूमिका घेतली होती. तसेच आता शोएब अख्तरही करत आहे. दोघांच्याही स्वप्नांवर भारताने पाणी फेरले होते. शोएबच्या मुखातून अशी गोष्ट निघणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. तरीही शोएब अख्तरने स्वतःला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचे प्रयत्न केले. मात्र, अशा व्हीडिओमुळे ते हाणून पडले. काश्मीरमध्ये अराजकता निर्माण करण्याचे पाकड्यांचे स्वप्न भारताने वेळोवेळी धुळीस मिळवले आहे. त्यामुळेच अशीच खदखद अधीमधी बाहेर येत राहते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
Custom-Image-1-v1
Img-Related-News-1-v1
Special-Embed-Code-2
Special-Embed-Code-2
Special-Embed-Code-2
Special-Embed-Code-2