पंतप्रधान मोदींना भाऊ म्हणणाऱ्या कार्यकर्तीचा संशयास्पद मृत्यू

22 Dec 2020 19:19:26

karima baloch_1 &nbs




                                             मृत्यूमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप


इस्लामाबाद: पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रातांत बलुच नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा कॅनडा येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. करीमा बलोच रविवारपासूनच बेपत्ता होत्या; त्यांचा मृतदेह टोरंटोमध्ये आढळला. २०१६ साली बलोच स्टुडंट ऑर्गेनायझेशनच्या करीमा बलोच अध्यक्षपदी असताना यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानत एक भावनिक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता.
 
 
 
 
करीमा बलोच यांनी बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कर करत असलेल्या अन्याय-अत्याचाराला संयुक्त राष्ट्र संघात वाचा फोडली होती. त्यामुळे करीमा बलुचा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या हत्येच्या संशयाची सुई पाकिस्तान सरकार आणि गुप्तचर संघटना आयएसआयवर आहे. बलुचिस्तानमधील अनेकजण अशाच पद्धतीने बेपत्ता आहेत. पाकिस्तान लष्कराने अनेक बलुच नागरिकांची हत्या केली.
 
 
 
 
वर्ष २०१६ मध्ये करीमा बलोचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ म्हणत रक्षाबंधनाच्या दिवशी बलुचिस्तानमधील एका बहिणीचा आवाज ऐकण्याचे आवाहन केले होते. व बलुचिस्तानमधील नरसंहार, युद्ध अपराध आणि मानवाधिकार हक्कांच्या पायमल्लीविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर बलुच नागरिकांचा आवाज बनण्याचे आवाहन करीमाने पंतप्रधान मोदींना केले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0