'या' चार खेळांचा 'खेलो इंडिया' मध्ये समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |




mallamkhamb_1  




'मल्लखांब'सह आणखी तीन स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता



मुंबई: मल्लखांबसह, गटका, कलरीपायूट्टू आणि थांग-ता या स्वदेशी खेळांचा समावेश आता 'खेलो इंडिया युवा क्रीडा' स्पर्धेत होणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवार दि. २० डिसेंबर रोजी या चार स्वदेशी खेळांना अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विटरवरून ही माहीती दिली.








'खेलो इंडिया युवा क्रीडा' स्पर्धेत समाविष्ट होणाऱ्या चारही खेळांचे फोटो शेअर करत, किरेन रिजीजू म्हणाले , ‘‘भारताला देशी खेळांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे या खेळांचे रक्षण करणे व त्यांचा प्रसार करून ते लोकप्रिय करण्याचे क्रीडा मंत्रालयाचे धोरण असेल. हे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना 'खेलो इंडिया' स्पर्धेसारखे दुसरे चांगले व्यासपीठ असू शकत नाही. पुढील खेलो इंडियामध्ये योगासनाबरोबरच या चार खेळांचा समावेश असेल. त्यामुळे क्रीडाप्रेमींचे या स्पर्धेकडे लक्ष लागले आहे. येत्या काही वर्षांमध्ये आणखी काही स्वदेशी खेळांचा 'खेलो इंडिया' स्पर्धेत समावेश करण्यात येईल.’’



ज्या चार खेळांना ही अधिकृत मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिली आहे, त्यातील 'मल्लखांब' हा खेळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसहित संपूर्ण भारतात खेळला जातो. 'गटका' हा खेळ पंजाबमध्ये खेळला जातो. तसेच 'कलरीपायूट्टू' हा खेळ प्रामुख्याने केरळमध्ये खेळला जात असून 'थांग-ता' हा खेळ प्रामुख्याने मणिपूर येथे खेळला जातो; जो मार्शल-आर्ट या साहसी खेळाशी संबंधित आहे.


*मल्लखांब

mallakhamb_1  H


*गटका

gataka_1  H x W



*कलरीपायूट्टू


kalaripayattu_1 &nbs


*थांग-ता


thang-ta_1  H x

@@AUTHORINFO_V1@@