काय म्हणताय! कोरोना संपला मग ही बातमी वाचा!

21 Dec 2020 14:45:12
london_1  H x W
 
 


कोरोनाचा नवा विषाणू ठरणार ७५ टक्के घातक

 
 
 
लंडन : एकीकडे कोरोना लसीची सर्वजण वाट पाहत आहेत. कोरोना आकडेवारी कमी होताना दिसत आहे मात्र, महामारीच्या काळ अद्याप संपलेला नाही. ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतरही कोरोना विषाणूत म्यूटेशन (नवा विषाणू ) दिसून आला आहे. यानंतर सौदी अरब सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केली आहे.
 
 
 
तसेच सर्व ठिकाणच्या सीमाही बंद करून टाकल्या आहेत. सरकारतर्फे सांगण्यात आले आहे की युरोपीय देशातून सौदीमध्ये आलेल्यांना दोन आठवड्यांसाठी विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे. गेल्या तीन महिन्यांत युरोपातून आलेल्या प्रवाशांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. त्यातच तुर्कीनेही ब्रिटन, डेनमार्क, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्ड येथून येणाऱ्या विमानांवर बंदी आणली आहे. जगभरात कोरोनाचे एकूण ७ कोटी ७१ लाख ६९ हजार ३५९ रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने यातील ५ कोटी ४० लाख ८८ हजार ४८३ रुग्ण बरे झाले आहेत. महामारीतून आता १६ लाख ९९ हजार ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
 
 
 
नवा विषाणू असणार ७० टक्के घातक
 
 
कोरोना विषाणू नव्याने बदल होत आहे. या प्रक्रियेला म्यूटेशन असे म्हणतात. या प्रक्रियेत त्याचे गुणधर्म बदलत जात आहेत. विषाणूमध्ये म्यूटेशन झाल्यानंतर तो स्वतःहून संपतो, असे म्हणतात. मात्र, कधी कधी हा विषाणू पूर्वीपेक्षा घातक ठरत जातो. ही प्रक्रीया इतकी गतीमान असते की वैज्ञानिकही यातील बदलू शकत नाहीत. वैज्ञानिकांचे हे म्हणणे आहे की, कोरोनाचे नवे विषाणू हे पूर्वीपेक्षा ७० टक्के घातक असू शकतात.
 
 
UK मध्ये प्रतिबंध, १३ देशांनी ब्रिटनची विमानसेवा बंद केली
 
 
UK सरकारने कडक प्रतिबंध लागू केले आहेत. लंडनमध्ये घरातून निघण्यासाठी मनाई केली जाऊ शकते. १३ युरोपीय देशांनी फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वीत्झरलँड, पोर्तुगल, बेल्जिअम, ऑस्ट्रीया, बुल्गारिया, डेन्मार्क, फिनलँड, रोमानिया, क्रोएशिया आणि नेदरलँडतर्फे UK येथून येणाऱ्या विमानांवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. तेव्हा कॅनडामध्ये UK येथून येणाऱ्या फ्लाईट्सवर ७२ तासांचे निर्बंध घातले आहे.
 
 
 
जगभरातील अपडेट्स
 
 
अमेरिका : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यात्मिक सल्लागार जेंटजन फ्रेंकलिन पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. फ्रेंकलिन नॉर्थ जॉर्जियातील गेन्सविलचे फ्रि चॅपल चर्चमध्ये पादरी आहेत. गेल्या आठवड्यात झेंटजन यांनी आपल्या परिवारासह नाताळ पार्टी केली होती. १५ डिसेंबर रोजी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केली होती.
 
 
 
दक्षिण कोरिया : कोरोनावर प्रत्येक अपडेट्सवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आता ९२६ कोरोना रुग्ण आहेत. तर ६९८ मृत्यू झाले आहेत. सरकारने खासगी रुग्णालयाना तिनशे खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या सुविधांसाठी सरकारतर्फे एकूण ४.५ दशलक्ष डॉलर रुपयांची मदत केली आहे.


Powered By Sangraha 9.0