पंतप्रधान २२ डिसेंबरला 'एएमयू'च्या शताब्दी समारंभाला करणार संबोधित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |
Pm Modi_1  H x
 
 
 

टपाल तिकीटाचेही अनावरण करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत. या समारंभात पंतप्रधान एका टपाल तिकिटाचेही प्रकाशन करणार आहेत. या विद्यापीठाचे कुलगुरू महामहिम सैदाना मुफद्दल सैफुदीन आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल नि:शंक हे देखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
भारतीय विधान परिषदेच्या कायद्यान्वये १९२० साली मोहम्मेडन अँग्लो ओरीएंटल महाविद्यालयाला (MAO) मध्यवर्ती विद्यापीठाचा दर्जा देऊन त्याचे अलिगढ मुस्लीम विद्यापीठात रुपांतर झाले. MAO कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी १८७७ साली केली. उत्तरप्रदेशातील अलिगढ या शहरात ४६७.६ हेक्टर आवारात हे विद्यापीठ वसलेले आहे. मालाप्पुरम (केरळ), मुर्शिदाबाद-जांगिपूर (पश्चिम बंगाल) आणि किशनगंज (बिहार) या ठिकाणी या विद्यापीठाची उपकेंद्रे आहेत.



@@AUTHORINFO_V1@@