शेअर बाजारात ६ लाख कोटींचा चुराडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |

BSE_1  H x W: 0
 
 
 
 
मुंबई : शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दुपारी १८०० अंकांनी गडगडला. घसरणीसह तो ४५ हजार ४९८.१२ इतकी कामगिरी करत आहे. रिलायन्स इंटस्ट्रीजचा शेअर चार टक्क्यांनी घसरला. सकाळी तो दोन टक्क्यांनी वधारला होता. शुक्रवारी बाजार बंद झाला त्यावेळी एकूण भाग भांडवल १८५ लाख कोटी रुपये इतके होते. आता ६ लाख कोटींनी घसरून ते १७० लाख कोटींवर येऊन पोहोचले आहे.
 
 
 
दुपारनंतर अचानक बाजारात घसरण सुरू झाली आहे. शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण सुरू झाली आहे. नफेखोरीमुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरण पाहायला मिळाली. जागतिक पातळीवर लॉकडाऊन आणि कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वृत्तांनी शेअर बाजारावरही परिणाम झाला आहे. अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद केली आहे.
 
 
 
बीएसईमध्ये घसरण झाली असताना RIL, बजाज, इंडसइंड बँक, एसबीआय, महिंद्रा आणि महिंद्रा शेअर वधारलेले दिसत आहे. यात एकूण २ हजार २४ कंपन्यांच्या शेअर्सनी बाजारात घसरण नोंदवली आहे. बीएसईमध्ये जेट एअरवेजच्या शेअरमध्ये लोअर सर्किट लावण्यात आले आहे. त्यामुळे ५ टक्क्यांनी घसरणीसह तो १०५.९५ रुपयांवर पोहोचला आहे.
 
 
 
दुसरीकडे निफ्टी २२७.४५ अंकांनी घसरला. तो १३ हजार ५३३.१० वर कामगिरी करत होता. बँक इंटेक्स ८०१ अंकांनी घसरत २९ हजार ९१३ वर कामगिरी करत आहे. यात फेडरल बँक ६ टक्क्यांनी घसरत होता. तर आयटी क्षेत्रात मात्र तेजी दिसून आली. निफ्टी मेटल इंडेक्स ३ टक्क्यांनी घसरणीसह कामगिरी करत आहे. हिंदुस्तान कॉपरचा शेयर ७ टक्क्यांच्या घसरणीसह कामगिरी करत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई सकाळी २८,५१ अंकांनी खुला झाला तो ४६ हजार ९३२.१८ वर कामगिरी करत होता. निफ्टी १८.६५ अंकांच्या घसरणीसह काम करत तो १३ हजार ७४१.९० वर खुला झाला.





@@AUTHORINFO_V1@@