डरना जरुरी है ! 'बाजार'गप्पांपासून असे रहा सावध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2020
Total Views |

BSE_1  H x W: 0
 



शेअर बाजारातील नफेखोरीच्या जाहिरातीपासून तुम्हीही बळी पडलात ?

अगदी बरोबर वाचलत शेअर बाजाराची भीती असणे आवश्यकच आहे.कित्येक लोक आपण बघतो की आपल्या अनलिसिस वरती किंवा आपल्या स्ट्रॅटेजीवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवतात एखादी रणनिती समजा दोन चार महिने काय जरा व्यवस्थित चालली की लेगच ते स्वतःला देवच समजू लागतात आणि वाट्टेल ती आवश्वसने देऊ लागतात काही लोक कोर्सेस चालू करतात तर काही लोक पोर्टफोलिओ मॅनेज करायला सुरुवात करतात.
 
शेअर बाजारात तुम्ही काहीही करा पण आपल्याला मर्यादा ओळखून करा. जशी मराठीत म्हण आहे "अंथरूण पाहून पाय पसरावे "अगदी तसेच काही तरी आपल्याला शेअर बाजारात करावे लागते. जर आपण असे केले नाही तर येणार काळ हा खूप भयानक असू शकतो.
 
 
 
कमी काळात मिळालेल्या यशामुळे त्याच्या मनात आपल्याला सर्व काही येते असा गैरसमज निर्माण होऊ लागतो त्यामुळे काही ट्रेडर किंवा अनलिस्ट हे खूप मोठ्या प्रमाणावर काम करायच अस ठरवतात आणि अचानक शेअर बाजारात मोठी मंदी किंवा तेजी येते आणि ही परिस्थिती त्यांना नवीन असते अश्या प्रकारची परिस्थिती त्यांनी ह्या आधी कधीच बघितली नसते काय करावे आणि काय नाही हे समजत नाही आणि अश्यात त्यांच्या हातून नकळत चूका होत जातात.
 
 
 
शेअर बाजारात काम करत असताना आपल्या मनात शेअर बाजाराविषयी आदरयुक्त भीती असलीच पाहिजे. पुढच्या मिनिटाला काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही भले ही तुम्ही टेक्निकल अनलिसिस करा किंवा फंडामेंटल करा किंवा अजून काहीही आपण जो काही स्टडी करतो तो मागील घटना,प्राईस चार्ट्स बघून आपण त्याविषयी एक अंदाज बांधत असतो आणि शेअर बाजारात काम करत असतो.
 
 
शेअर बाजारात काम करताना आत्मविश्वास हवा पण अति-आत्मविश्वास हा खूप धोकादायक असतो जेव्हा तुमच्या मनातील शेअर बाजार विषयीची किंवा नुकसानाची भीती नष्ट होते तेव्हा आपण वाट्टेल तसे ट्रेड करू लागतो कोणत्याही गोष्टीचा विचार न करता बिनधास्त ट्रेडिंग करतो, आपल्याला अस वाटू लागतं की बस शेअर बाजारात आपणच राजे आहोत आपल्या मर्जी नुसारच मार्केट काम करते.
 
शेअर बाजारात होत्याच नव्हतं व्हायला एक दिवस खूप होतो जर तुम्ही आपल्या मर्यादेपलीकडे जाऊन काम करत असाल आणि त्यात आपण आपली जोखीम न ओळखता काम करत असाल तर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होऊ शकते. शेअर बाजारात काम करत असताना खालील गोष्टींचा नेहमी विचार करावाच लागतो
 
 
१) मर्यादित कॅपिटल - शेअर बाजारात काम करत असताना आपण जेवढी जोखीम घेऊ शकतो तेवढेच कॅपिटल आपल्या ट्रेडिंग अकाऊंटला ठेवावे उदा. १ लाख त्यावरतीच जे काही इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग करायची असेल ते सर्व १ लाख करावे त्यावरती जे काही प्रॉफिट होईल ते महीन्याच्या शेवटी आपल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करावे. आपल्या बँक खात्यात काही रक्कम ही ट्रेडिंग साठी ठेवावी जेणे करून कधी मार्केट एकदम पडले तर त्याचा योग्य वापर करता येऊ शकतो. जेवढे जास्त कॅपिटल आपण ठेवतो तेवढी ट्रेड करण्याची इच्छा वाढत जाते ट्रेड ची संख्या वाढत गेली की ट्रेडिंग वरती त्याचा परिणाम हा होतोच.
 
 
२) मार्जिन ट्रेडिंग - मार्जिन जेवढे चांगले आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने ते वाईट आहे.ट्रेडर्स ने मार्जिन चा वापर योग्य पद्धतीने करावा गरज असेल तरच मार्जिनचा वापर करावा अन्यथा कमी मार्जिन घेऊनच काम करावे.
 
 

३) स्टॉप लॉस- हल्ली ट्रेंडर्सचा स्टॉप लॉस हिट झाला की त्याला लगेच आपण हरल्याची भावना मनात येते तो लगेच निराश होतो,असे न करता उलट स्टॉप लॉस आपल्याला मोठ्या नुकसान होण्यापासून वाचवतो नेहमी स्टॉप लॉसचा वापर करावा.
 
 
४) अनुकरण - हल्ली शेअर बाजारात नवीन ट्रेडरचे दुसऱ्याने केलेल्या प्रॉफिटमध्ये जास्त लक्ष असते समोरचा ट्रेडरचे प्रॉफिट स्क्रिनशॉट बघून माझे प्रॉफिट देखील तेवढेच असले पाहिजे परंतु त्या व्यक्तीने त्यासाठी किती लॉस सहन केला असेल त्या मागची मेहनत किंवा त्याची जोखीम घेण्याची तयारी ह्या गोष्टींचा विचार अजिबात नाही करत फ़क्त दुसरा कमावतो आहे ना तसेच माझे देखील प्रॉफिट असले पाहिजे.
 
 
 
५) श्रीमंत होण्याची घाई - सध्या "२१ दिन मै पैसे डबल " असच काही तरी चालू आहे मार्केट मध्ये जरा कुठे दिवसा ५०००/१०००० रु कमवा अशी पोस्ट दिसली की आपण लगेच आपले नंबर कमेंट करून मोकळे होतो थोडा विचार करा हे शक्य आहे का ? दिवसाला ५/१०% प्रॉफिट आपल्या कॅपिटल वरती इतके शेअर बाजार सोपे नाही उगाचच मृगजळाच्या मागे लागू नका. शेअर बाजार एक उत्तम व्यवसाय आहे त्यामध्ये योग्य पद्धतीने काम केले तर नफा हा होतो थोडा उशीर झाला तरी चालेल पण घाई करू नका. आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवावे आणि शेअर बाजारात काम करावे.
 
 
"मार्केट से बडा कोई एक्स्पर्ट नही होता हमेशा याद रखना!"
 
 
- नितिलेश पावसकर
 
सेबी रजिस्टर रिर्सचं अनलिस्ट(INH000004547)
 
तनिषा अकॅडमी (रत्नागिरी)
 
८६०५१६८५२५
@@AUTHORINFO_V1@@